Availability: In Stock

Goel Prakashan – Abhinay Tantra Ani Mantra ( अभिनय तंत्र आणि मंत्र )

250.00

Publisher : Goel Prakashan
Pages : 189
Edition : Latest
Binding : Paperback
Language : Marathi
Translator :

अभिनयाची अनेक तंत्र, वैशिष्ट्य या पुस्तकात सविस्तरपणे विशद केली आहेत. जेणेकरून, केवळ व्यक्तिगत आवड- निवड इतकंच त्याचं मर्यादित स्वरूप न राहता, अत्यंत शास्त्रीय व अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून त्याविषयीचं लेखन यात लेखकाने साकारलं आहे. यशस्वी अभिनेता- अभिनेत्री म्हणून यशस्वी करिअर करण्यासाठीच सुयोग्य मार्गदर्शन लेखकाने केलं आहे.

या पुस्तकाचे लेखक : संतोष शिंदे ,प्रकाशक : गोयल प्रकाशन

Description

सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यग्र जीवनातही अनेक जण स्वतःचे छंद आणि आवडीनिवडी जोपासताना दिसतात. त्यामध्ये, गायन-वादनापासून ते विविध गोष्टींचा संग्रह करण्यापर्यंत खूप गोष्टी अंतर्भूत असतात. त्यांपैकीच एक म्हणजे, अभिनयकला आणि त्याच्याशी निगडित इतरही अनेक गोष्टी. अनेकांना अभिनयकलेविषयी प्रचंड कुतूहल असतं, जिज्ञासा असते. किंबहुना, आपणही एकदा तरी अभिनय करावा, असंही वाटत असतं. अशा सगळ्यांसाठीच हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट वाचनानुभूतीच आहे.

अभिनयाची अनेक तंत्रं, वैशिष्ट्यं या पुस्तकात सविस्तरपणे विशद केली आहेत. जेणेकरून, केवळ व्यक्तिगत आवड-निवड इतकंच त्याचं मर्यादित स्वरूप न राहता, अत्यंत शास्त्रीय व अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून त्याविषयीचं लेखन यात लेखकाने साकारलं आहे. यशस्वी अभिनेता-अभिनेत्री म्हणून यशस्वी करिअर करण्यासाठीचं सुयोग्य मार्गदर्शन लेखकाने केलं आहे. त्यादृष्टीने अभिनयकलेचा सर्वांगीण विचार केला जाण्याचं महत्त्व हे पुस्तक विशद करतं. त्यासाठी स्वतः आत्मसात करण्यासाठीची कौशल्यं आणि त्यांबाबतचं मार्गदर्शन साध्या-सोप्या शैलीत वाचकांसमोर आल्याने आशयस्पष्टता आणि विषयस्पष्टता अशा दोन्ही दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण असं हे पुस्तक आहे. म्हणूनच, मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी असं हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – Abhinay Tantra Ani Mantra ( अभिनय तंत्र आणि मंत्र )”

Your email address will not be published. Required fields are marked *