Availability: In Stock

Goel Prakashan – Swatantraveer Savarkar : Charitra Gatha | स्वातंत्रवीर सावरकर : चरित्र गाथा

250.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan (24 December 2023); Goel Prakashan
Perfect Paperback ‏ : ‎ 244 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393624534
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393624536
Reading age ‏ : ‎ 6 years and up
Item Weight ‏ : ‎ 300 g
Dimensions ‏ : ‎ 23 x 19 x 4 cm
Packer ‏ : ‎ Goel Prakashan

Description

भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकरयांचा जीवन-साहित्यवेध

सावरकरांचा पिंडच मुळी क्रांतिकारकाचा होता. नवे विश्व निर्माण करण्याची रचनात्मक बाजू सदैव विचारांशी संलग्न होती. स्थितीकडून गतीकडे, ग्लानीकडून चैतन्याकडे, भेकडतेकडून शौर्याकडे खेचून नेण्याची क्षमता तिच्या अंगी होती.राजकीय क्षेत्रातील क्रांतीपुरताही विचार केला तरी, त्यांची क्रांती परकीय राजवट उलथून टाकीत असतानाच राष्ट्रैक्य, समता व लोकसत्ता यांची प्रतिष्ठापना करू पाहात होती. राज्यक्रांतीसाठी निर्माण केलेला प्रक्षोभ स्वातंत्र्यप्राप्ती होताच शमावा व नंतर नीतियुक्त राजकारण कुणीही सोडू नये अशी त्यांची शिकवण होती. स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या देशात सामाजिक पुनर्रचनेचा प्रश्न महत्त्वाचा असून त्यासाठी एक विधायक रूपरेषा नेहमीच समोर असावी लागते. ती तशी असली तरच क्रांती ही लोकक्रांती होते; अन्यथा ती हुकूमशाहीत परिवर्तित होण्यास उशीर लागत नाही, अशी सावरकरांना खात्री होती.

सावरकर म्हणतात, ‘तुम्ही आम्हाला बंदूक नाकारता म्हणून आम्हाला पिस्तूल धारण करावे लागते. तुम्ही प्रकाश नाकारता म्हणून आम्हाला अंधारात एकत्र जमून मातृभूमीच्या दास्यशृंखला तोडायचे मनसुबे रचावे लागतात.’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – Swatantraveer Savarkar : Charitra Gatha | स्वातंत्रवीर सावरकर : चरित्र गाथा”

Your email address will not be published. Required fields are marked *