Description
आगामी तलाठी भरतीसाठी मागील दोन्ही वर्षाच्या म्हणजेच 2023 व 2019च्या ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक ठरते; कारण त्याद्वारे आपल्याला अभ्यासाचे महत्वाचे घटक कोणते आणि या घटकांवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते लक्षात येते. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी व जनरल नॉलेज या घटकांची खोली व व्याप्ती आणि अंकगणित व बौद्धिक चाचणीवरील प्रश्नांचे स्वरूप लक्षात येण्यास मदत होते. त्याद्वारे आपणास आपल्याला मिळालेला वेळ लक्षात घेऊन एका Perfect Plan ची आखणी करणे सोपे जाते. हाच प्लॅन आपणास यशाच्या दिशेने मार्गस्थ करतो. या पुस्तकाच्या पहिल्या विभागात सन 2023 मधील 57 व दुसऱ्या विभागात सन 2019 मधील 36 म्हणजेच एकूण (57+36) = 93 प्रश्नपत्रिका समाविष्ट केलेल्या आहेत. मात्र, असे करताना केवळ प्रश्नोत्तरे न देता आगामी परीक्षेत ज्या PYC) बर नवे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दिसून येते त्यांचे विस्तृत विश्लेषण व स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अंकगणित व बौद्धिक चाचणी या विषयांच्या बाबतीत अवपड प्रश्न सोडविण्याची सोपी पद्धत/ट्रिक दिलेली आहे. बहुतांशी उत्तरे उत्तरतालिकेनुसारच दिलेली असली तरी अनिवार्य असेल तेथे उत्तरात, कालबाह्य प्रश्नात, तर काही वेळा पर्यायांत योग्य तो बदल करण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. काही ठिकाणी अतिशय संदिग्ध प्रश्नाऐवजी त्याच घर्तीवरचा नवा अधिक उपयुक्त प्रश्न समाविष्ट केला आहे. चोडक्यात, या पुस्तकाची उपयुक्तता वाढावी यासाठी शक्य तो प्रयत्न करण्यात आला आहे.







Reviews
There are no reviews yet.