Availability: In Stock

Adhunik Bharatatil Rajkiya Vichar Thomas Pantham, Kenneth Deutsch

Original price was: ₹525.00.Current price is: ₹446.00.

Adhunik Bharatatil Rajkiya Vichar

Thomas Pantham, Kenneth Deutsch

या खंडातील वीस स्फूर्तिदायक आणि अस्सल निबंधांमध्ये प्रमुख आधुनिक भारतीय राजकीय विचारधारांचे समग्र विश्लेषण आढळून येते.

राजा राममोहन रॉय, दयानंद सरस्वती, बंकीमचंद्र चट्टोपाध्याय, रानडे, फुले, टिळक, आंबेडकर, टागोर, योगी अरविंद, एम. एन. रॉय, नेहरू आणि गांधी या विचारवंतांच्या कार्याची चर्चा ग्रंथात करण्यात आली आहे. त्याचबरोबर, हिंदू व मुस्लिम राजकीय विचारधारा, हिंदू राष्ट्रवाद, कम्युनिस्ट आणि सर्वोदय चळवळी यांविषयी स्वतंत्र प्रकरणांमध्ये विवेचन आहे. या निबंधांचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक विचारवंत किंवा विचारसरणीचा तत्कालीन सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भासह अभ्यास करण्यात आला असून; त्यांचा भारतीय राजकीय विचारधारेवर काय परिणाम आणि प्रभाव झाला याचाही धांडोळा घेण्यात आला आहे. हे सर्व जागतिक, ऐतिहासिक आणि राजकीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आले आहे.

आधुनिक भारतीय राजकीय विचारसरणीतील दोन प्रमुख मतप्रवाहांचा परामर्श या निबंधांमध्ये घेण्यात आला आहे ज्यांनी पाश्चिमात्य राजकीय परंपरा अंगिकारण्यास प्राधान्य दिले असे आणि ज्यांनी स्वदेशीवादावर भर देऊन पर्यायी विचार मांडले असे. पण आधुनिक काळाशी सुसंगत असे सर्वंकष राजकीय तत्त्वज्ञान मांडण्यासाठी या दोन्ही विचारप्रवाहांचा अभ्यास आवश्यक आहे, असा निष्कर्ष या ग्रंथातून काढता येतो. गांधीर्जीचे काही सामाजिक-राजकीय विचार आधुनिक काळातही किती वैश्विक आहेत, हेही काही प्रकरणांतून स्पष्ट होते.

आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानात या ग्रंथाने मोलाची भर घातली आहे. राज्यशास्त्राचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना याचा खूप फायदा होईल.

Political Science Book For MPSC, UPSC Mains

Description

PRODUCTS DETAILS

Author : Thomas Pantham, Kenneth Deutsch
Edition : 2017
Language ‏ : Marathi
Publisher ‎ : SAGE Publications India Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Adhunik Bharatatil Rajkiya Vichar Thomas Pantham, Kenneth Deutsch”

Your email address will not be published. Required fields are marked *