Description
PRODUCTS DETAILS
Author : Dr. Parmeshwar Paul, Dr. Balaji Avha
Edition : 2019
Language : Marathi
Publisher : Vidya Books Publishers
Original price was: ₹180.00.₹162.00Current price is: ₹162.00.
Bhaugolik Mahiti Pranali (GIS)
Dr. Parmeshwar Paul, Dr. Balaji Avhad
आधुनिक तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवनात गतिशीलता वाढत जात आहे. शिवाय वाहतूक, संदेशवहन उपलब्धतेमुळे जग जवळ आले आहे. त्यात वाढत जाणारी लोकसंख्या व त्या तुलनेत पृथ्वीवरील मर्यादित संसाधने अशा स्थितीत भौगोलिक घटकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भूपृष्ठावरील इंचइंचाची नेमकी माहिती मिळवणे ही काळाची गरज आहे. शाश्वत विकासासाठी अचूक व अद्ययावत माहिती संकलन करून, त्याचे पृथक्करण करून दैनंदिन जीवनात उपयोजन करण्यासाठी ही सक्षम प्रणाली आहे. त्यामुळे जीआयएस आधुनिक काळात नियोजनात वापरले जाणारे अतिमहत्त्वाचे तंत्र बनले आहे. शिवाय दैनंदिन जीवनात लोकांना जीआयएस प्रणालीमार्फत सहज माहिती उपलब्ध होत आहे. शासकीय व अशासकीय संस्था वापरकर्त्याला माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रणाली वापरत आहेत. जीआयएसचा वापर शेती, पर्यावरण, वन, जल, भूमी, हवामान, पर्यटन, शिक्षण, गुन्हेगारी, संशोधन, उद्योगधंदे, सुरक्षा, वाहतूक, संदेशवहन इत्यादी अनेक क्षेत्रात केला जात आहे. शिवाय भूगोल, भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र व सामाजिकशास्त्रात जीआयएसच्या उपयुक्ततेमुळे अभ्यास केला जात आहे. जीआयएस हे १९६१ नंतर विकसित झालेले तंत्रज्ञान आहे आणि गतिशील असल्यामुळे त्यात सातत्याने बदल होत आहेत. सध्या या तंत्रज्ञानातील उपयुक्ततेमुळे विद्यार्थ्यांनादेखील करिअरच्या अनेक संधी या क्षेत्राकडे खुणावत आहेत. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा विषय सोपा जावा, विद्यार्थ्यांना या क्षेत्राची ओळख व्हावी. हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.
MPSC, UPSC Optional Book
PRODUCTS DETAILS
Author : Dr. Parmeshwar Paul, Dr. Balaji Avha
Edition : 2019
Language : Marathi
Publisher : Vidya Books Publishers
Reviews
There are no reviews yet.