Description
१९१० नंतर फ्रॉइडप्रणित मनोविश्लेषणाकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. याच शतकात समाज जीवन ढवळून टाकणाऱ्या अनेक घटना, पथ, संप्रदाय उदयास आले. वैचारिक क्षेत्रात ज्यांच्याशी कडाकडून भिडावे, असे सिद्धांत मांडले गेले. फ्रॉइड यांच्या बाजूने आणि विरोधात उभे राहून अजूनही वाद झडतात, हे त्यांच्या हातून घडलेल्या विचार जागृतीचे लक्षण मानावे लागेल. सिग्मंड फ्रॉइड म्हटले की कार्ल युंग आणि ॲडलर हे आलेच.
केवळ मानसशास्त्राच्या अभ्यासकालाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकाला मनाच्या गुहेत नेऊन सिग्मंड फ्रॉइड वेगळेपण आणि विचारधारा, कलाक्षेत्रातील फ्रॉइडचा प्रभाव, इडिपस कॉम्प्लेक्स (मातृप्रीतीगंड), इडिपस रेक्सचे कथानक, मनोभाव (इमोशन्स) मनासंबंधी पाश्चात्य विचार, मनासंबंधी भारतीय विचार तसेच मनोधैर्य आणि नेतृत्त्व आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोविश्लेषण आणि सिग्मंड फ्राईड, चिंता, मनोविश्लेषणात्मक चिकित्सा, स्वप्नमीमांसा आणि मनोविश्लेषणवादी चळवळ, कार्ल चुंग : सामूहिक नेणिव, आदिबंध आणि आदिबधात्मक समीक्षा, अडॅलर अल्फ्रेड : व्यक्तिमानसशास्त्राचा प्रणेता, न्यूनगंड, लाज व खंत यांचा परिचय करुन देत त्यांचे स्वरुप समजून सांगावे, या केवळ प्रांजळ उद्देशाने मी हे संकलन, संपादन व मांडणी केली आहे.
Reviews
There are no reviews yet.