Availability: In Stock

Goel Prakashan – Martin Luther King Chi Sangarshmay Jeevan Kahaani | मार्टिन ल्यूथर किंग याची संघर्षमय जीवनकहाणी !

199.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan; First Edition (13 June 2024); Goel Prakashan, 162, Budhwar Peth, Pune-411002
Language ‏ : ‎ Marathi
Perfect Paperback ‏ : ‎ 151 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393624887
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393624888
Reading age ‏ : ‎ 8 years and up
Item Weight ‏ : ‎ 200 g
Dimensions ‏ : ‎ 23 x 21 x 2 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Goel Prakashan, 162, Budhwar Peth, Pune-411002

Description

अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचा, महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेला, अहिंसा व निःशस्त्र प्रतिकार, यांचेवर दृढ श्रद्धा असलेला ख्यातनाम निग्रो नेता आणि नागरी हक्क समानतेचा कट्टर पुरस्कर्ता, मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनिअर) याची संघर्षमय जीवनकहाणी !

बर्मिंगहम तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात अहिंसात्मक प्रत्यक्ष प्रतिकारासंबंधीची आपली भूमिका मार्टिन ल्यूथर किंग यांनी विशद केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘गांजलेले लोक कायमचे गांजलेले राहू शकत नाहीत. स्वातंत्र्याची ऊर्मी कधीतरी उफाळून येतेच! अमेरिकेत काळ्यांच्या बाबतीत असेच झाले. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही जाणीव अंतःप्रेरणेने मला दिली आहे. मुख्य म्हणजे तो मिळवता येतो, ही जाणीव मला बाह्यप्रेरणेने दिली.’

एकीकडे विचारांच्या पातळीवर असा लढा देत असताना, किंग यांनी अहिंसेच्या विचारांवर आधारलेल्या चळवळीला मजबूती आणण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. यात त्यांचे महानपण दडलेले आहे. १९६८ मध्ये ‘पुअर पीपल्स कँपेन’ वॉशिंग्टन येथे भरविण्याचे किंग यांनी ठरवले होते. परंतु त्यापूर्वीच ४ एप्रिल १९६८ रोजी त्यांचा रेम्स अल रे या श्वेतवर्णीय इसमाने बंदुकीने गोळी घालून खून केला. इथे वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी या झुंझार, ध्येयनिष्ठ, उत्साही कार्यकर्त्याची जीवनयात्रा संपली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – Martin Luther King Chi Sangarshmay Jeevan Kahaani | मार्टिन ल्यूथर किंग याची संघर्षमय जीवनकहाणी !”

Your email address will not be published. Required fields are marked *