Description
PRODUCTS DETAILS
Author : O.P. Gauba, Vasanti Phadke
Edition : 1st 2025
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Original price was: ₹295.00.₹221.00Current price is: ₹221.00.
Indian Political Thought भारतीय राजकीय विचार
O.P.Gauba
K’ सागरीय…
डॉ. ओमप्रकाश गाबा, राज्यशास्त्र विषयातील राष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम लेखक, समाजशास्त्र व राज्यशास्त्र या दोन्ही विषयांत एम. ए. च्या पदव्या मिळविल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळविली. डॉ. गाबा हे दिल्ली येथील कॅम्पस ऑफ ओपन लर्निंग युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापन कार्य करीत आहेत.
जेव्हा दुसऱ्या भाषेतील एखाद्या शैक्षणिक ग्रंथाचा मराठीत अनुवाद करावयाचा असतो, तेव्हा अनेक अवधानं आणि व्यवधानं सांभाळावी लागतात आणि जेव्हा हा मूळ ग्रंथ एक अत्युत्कृष्ट संदर्भग्रंथ असतो; राज्यशास्त्र हा या ग्रंथाचा अभ्यासविषय असतो आणि तो डॉ. ओमप्रकाश गाबा यांच्या शैलीदार लेखणीतून उतरलेला असतो, तेव्हा ते तुमच्या ज्ञानाचा पूर्ण कस लावणारे आव्हानात्मक कार्य ठरते.
डॉ. वासंती फडके. अस्मादिकांच्या मार्गदर्शक
सुहृद. राज्यशास्त्र विषयाचा गाढा व्यासंग. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर तितकीच हुकमत. त्यांनी हे आव्हानात्मक कार्य उत्तमरीत्या पार पाडलेलं, अन् ते करीत असताना डॉ. गाबा यांच्या मूळ लेखनास, त्यातील अर्थास आणि मथितार्थास, त्यांच्या लेखनशैलीस व भाषाशैलीसही पुरेपूर न्याय दिलेला.
प्रस्तुत ग्रंथाच्या मराठी भाषांतराचे हक्क दिल्याबद्दल आदरणीय डॉ. गाबा आणि नॅशनल पब्लिशिंग हाउसचे मॅनेजिंग डायरेक्टर एस. के. मलिक या दोहोंचे आभार मानल्याशिवाय या मनोगतास पूर्णताच येऊ शकत नाही.
डॉ. गाबा यांच्या ग्रंथाचे हे भाषांतर पदवी व पदव्युत्तर परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी तद्वतच प्राध्यापकांसाठीही जसा एक परिपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल तसाच तो केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षार्थ्यांनाही त्यांच्या राज्यशास्त्र या वैकल्पिक विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त करून मी माझे मनोगत पूर्ण करतो.
आपलाच, व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
PRODUCTS DETAILS
Author : O.P. Gauba, Vasanti Phadke
Edition : 1st 2025
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Reviews
There are no reviews yet.