Description
KSagar Polity Of India With Special Refrance To Maharashtra
पॉलिटी ऑफ इंडिया प्रा. व्ही. बी. पाटील. राज्यशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक आणि प्राध्यापक व्यक्तीशः माझे ज्येष्ठ स्नेही व के’सागर परिवाराचे एक सुहृद. प्रकाशनाची काही पुस्तके त्यांच्या अभ्यासू लेखणीतून स्वतंत्रपणे साकारलेली तर काही पुस्तके त्यांनी मजबरोबर संयुक्तरीत्या लिहिलेली. फर्गसन कॉलेजचे माजी प्राचार्य दिवंगत डॉ. वि. मा. बाचल व प्रकाशनाचेही असेच हृद संबंध, अस्मादिकांनी त्यांच्या सोबत लिहिलेला भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार हा संदर्भही विद्यार्थी मित्रांना भावलेला. भारताची राज्यघटना साध्या-सोप्या शब्दांत, भारतीय राज्यव्यवस्था व भारतीय प्रशासन ही पुस्तके म्हणजे व्ही. वीं.च्या व्यासंगी लेखणीतून साकारलेल अभ्यासशिल्पेच होत! अस्मादिकांचं आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि इतर अनेक संदर्भ महाराष्ट्रीय तरुणांना भावलेले आणि आयोगाच्या परीक्षांकरिता उपयुक्त सिद्ध झालेले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या व सुधारित अभ्यासक्रमानुसार पूर्वीच्या प्रत्येकी १५० गुणांच्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सऐवजी प्रत्येकी २५० गुण असलेल्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सचा सामना आता आपणास करावयाचा आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे पूर्वीचे वस्तुनिष्ठ स्वरुपही आता परंपरागत झाले असून वस्तुनिष्ठ माहितीबरोबरच विश्लेषणात्मक स्वरूपाचा व विचाराला चालना देणारा आणि समीक्षणात्मक अभ्यासही परीक्षेच्या व नवीन अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचा ठरलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.