Description
Paryavaranacha Shashwat Vikas
Dr. Prakash Sawant
पृथ्वीवर सर्व प्रकारचे रंग फळाफुलांतून, पानापानांतून, जीवाजीवातून बघायला मिळतात. पर्यावरण व निसर्ग संसाधनांचा वापर करूनच मानवाने आपल्या गरजा पूर्ण केल्या व विकास घडवून आणला. सर्व घटकांमध्ये सदैव परिवर्तन होत असते. हळूहळू जगातील लोकसंख्येची वाढ जास्त होत गेली व गरजाही वाढू लागल्या. निसर्गघटकांचा अमर्याद वापर होत गेला. त्यातून अन्नपाण्याची कमतरता, प्रदूषण, रोगराई, कचरा इ. प्रश्न निर्माण झाले.
“निसर्ग जगला तरच आपण जगू शकू” या विचारातून “शाश्वत” “चिरंजीवी” विकासाची संकल्पना निर्माण झाली. निसर्ग पर्यावरणीय घटकांचा नाश होणार नाही. हे घटक कायम टिकून राहतील, हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, पक्षी सर्व प्रकारचे जीव यांचे संवर्धन व संरक्षण होईल. त्याबरोबरच मानवाच्या गरजाही पूर्ण होतील. हा समतोल साधण्यासाठी, गुणवत्ता व दर्जा कायम टिकवण्यासाठी, प्रसन्न, शांततामय, आनंदी, समृद्ध जीवनासाठी “शाश्वत विकासाची” प्रेरणा देण्याचे कार्य या अभ्यासातून मिळते.
MPSC, UPSC Optional Book
Reviews
There are no reviews yet.