Free delivery across Maharashtra on orders above ₹4999

Sale!

Samagra Lokprashasan Paper Pahila Prashasan Siddhant Prof. V. B. Patil K’sagar

Original price was: ₹525.00.Current price is: ₹400.00.

Product details

Book Name: Prashasan Siddhant (Lokprashasan Paper-1)
Publication: K’Sagar Publication
Author: Prof. V. B. Patil
Edition: 2025
Language: Marathi
No. of pages: 365 pages
Product Dimension (in cm): 22 x 1 x 28 cm
Weight: 700 g

  • Fast delivery Shipped across Maharashtra in 2–5 working days.
  • 100% genuine books Sourced directly from publishers and distributors.
  • Easy returns Damaged or wrong book? We replace it.
  • Secure payment UPI, Cards, Net Banking & Cash on Delivery

Description

Samagra Lokprashasan Paper Pahila Prashasan Siddhant Prof. V. B. Patil K’sagar

समग्र लोकप्रशासन पेपर पहिला प्रशासन सिद्धान्त

प्रा. व्ही. बी. पाटील

के’सागरीय…

सन २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यास-क्रमात व परीक्षापद्धतीत Drastic म्हणावा असा बदल किंबहना, सुधारणा आल्या आहेत. परीक्षेची व्याप्ती व सखोलता बादली असून आपल्या पेपरचे स्वरूपही वर्णनात्मक (Descriptive) झाले आहे, मराठी, इंग्रजी व निबंध या ३ पेपरसह आता आपणास सामान्य अध्ययनाच्या ४ पेपर्सचा व वैकल्पिक विषयाच्या २ पेपर्सचा अशा एकूण ९ पेपर्सचा सामना करावा लागणार आहे. एवम्, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या व केंद्र लोकसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात व परीक्षा पद्धतीत आता समानता आली आहे. एकाच वेळी या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल.

सन १९८६ किंवा त्यापूर्वीपासून सन २०११-१२ पर्यंत राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाचीच होती. केंद्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा आजही वर्णनात्मक स्वरूपाचीच आहे. अशा परीक्षांसाठी पुस्तके संरचित करण्याशी प्रकाशन गेली जवळ-जवळ ४० वर्षे संलग्न असून डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे के’सागर असे एक समीकरण रूढ झाले आहे.

प्रकाशनाच्या या प्रदीर्घ अन् यशस्वी अनुभवातून लोक-प्रशासन पेपर १ प्रशासन सिद्धान्ताच्या (विषय सांकेतांक १०५३) अभ्यासक्रमानुसार प्रस्तुतच्या संदर्भाची रचना केली आहे.

के ‘सागर परिवारातील प्रा. व्ही. बी. पाटील यांच्या-सारख्या या विषयातील गाढ्या व्यासंगी व अभ्यासू सुहृदाच्या सहयोगातून व बहुमोल योगदानातून प्रस्तुतचा संदर्भ साकारला आहे. या ग्रंथाच्या यशाचे श्रेय निर्विवादपणे प्रा. पाटील यांच्या व्यासंगी लेखणीच्या सहज आविष्कारासच द्यावे लागेल.

जास्तीत जास्त परीक्षाभिमुख रचना; पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या प्रकरणांना किती महत्त्व दिले गेले आहे, हे विचारात घेऊन त्या त्या प्रकरणाला दिले गेलेले महत्त्व; महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या गाभ्याशी स्थिरावणारी प्रकरणरचना व नेहमीची साधी सोपी के’सागरीय भाषाशैली ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये माझ्या विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावतील, यात शंकाच नाही.

आपलाच, व्ही. एस. क्षीरसागर

(K’Sagar)

Best Public Administration Book For MPSC UPSC Mains.

Available at AAi Book Centre or on

www.punebookdepo.com or call on 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Samagra Lokprashasan Paper Pahila Prashasan Siddhant Prof. V. B. Patil K’sagar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Menu

Shop by category

Categories

Browse all books