Description
आपल्या अंतर्मनाची क्षमता व ताकद खरोखरीच अफाट असते. आपण जर मनाच्या एका शांततेत पूर्ण प्रेमाने आणि अगदी हळूवारपणे आपल्या अबोध-सुप्त मनाशी संवाद साधला आणि त्याला योग्य सकारात्मक व संभाव्य सूचना दिल्या, तर सारे काही आपल्या मनासारखे घडू शकते. मुख्य म्हणजे, आपण आपल्या भयावर वा न्यूनगंडावर मात करू शकतो. आपले अबोध-अंतर्मन हे आपल्या संवादानुसार-सूचनेनुसार मोठ्या आज्ञाधारकरीतीने विचार-वर्तन करीत असते. आपल्या सूचना या नेणिवेच्या तळापर्यंत जातात आणि तिथेच त्याचा कोंभ रुजतो. पुढे त्याला काही दिवसातच अंकूर फुटतात. आपले अंतर्मन आणि आपले बाह्यमन यात समतोल, सहयोग आणि संवाद सतत राहू द्या! डॉ जोसेफ मर्फी
Reviews
There are no reviews yet.