Description
UPSC MPSC Adhunik Bharatacha Itihaas Vitthal Pungale आधुनिक भारताचा इतिहास
लेखक : विठ्ठल पुंगळे प्रकाशन : वेदिका पब्लिकेशन
दोन शब्द…
मित्रांनो
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या ‘जेथे होतो शेवट तेथेच होते सुरुवात पुन्हा मनातला काळोख करित लुकलुकता सान्या खुणा’ या ओळी आपणास इतिहासातील घटनांची पुनरावृती वारवार होत असल्याचे सांगत असतात. या विषयाचा मुळ उद्देश आपल्या भूतकाळातील घटनांच्या आधारे भविष्य उज्वल बनविणे हा आहे.
आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकातून नवभारताच्या निर्माणाची परंपरा आपल्याला समजावून घ्यायची आहे. आपल्या देशाचा स्वातंत्र्य लवा हा केवळ ब्रिटिशांविरुद्धाचा लथा नसून ती एक व्यापक प्रक्रिया होती. त्याचे स्वरूप सर्वसमावेशक होते व तीने आधुनिकतेची मूल्यचौकट तयार केली होती. तीचेच प्रत्यंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये आलेले आहेत. या प्रास्ताविकामध्ये नमूद केलेली मूल्य कशी अस्तित्वात आली, हे भारतातील घटनाक्रमाच्या सहाय्याने तुम्हाला समजू शकेल; परंतु केवळ घटनांच्या तपशीलांचा क्रमवार अभ्यास म्हणणजे इतिहास नव्हे तर तो घटनांशी संबंधित वैचारिकतेचा अभ्यास असतो. म्हणूनच प्रसिद्ध इतिहासकार ई.एच.कार यांच्या मते इतिहास म्हणजे वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्यात अखंडपणे चालणारा संवाद होय.
आर्थिक स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्य, सामाजिक समता, राजकीय समता, औद्योगिकीकरण आणि राजकीय स्वातंत्र्याच्या विविध प्रेरणा हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारतात झालेले विविध स्तरावरील अनेकांगी प्रयत्न यांची अर्थपूर्ण जाणीव याद्वारे होत असले, भारताचा स्वातंत्र्य लढा हा केवळ ब्रिटिशांविरुद्धचा लढा नव्हता. साम्राज्यवादी प्रवृत्ती व प्रेरणाविरूद्धचा तो एक व्यापक संघर्ष होता. आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक शोषणाच्या साम्राज्यवादी धोरणांविरुद्ध भारतीय जनतेने सुमारे शतक – -दिडशतकाच्या वैशिष्टयेपूर्ण संघर्षांनंतर भारताने आपले राजकीय स्वातंत्र्य मिळविले. या काळात जे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि वैचारिक बदल कळत-नकळत पडत गेले त्यातून आजच्या भारताची उभारणी झालेली आहे.
हे पुस्तक वाचतांना वाचनाची लय टिकून राहील याची काळजी घेतलेली आहे. तसेच ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करतांना Fact Data कोठेही कमी पडणार नाही याचीही काळजी घेतलेली आहे. समाज, धर्म, राजकारण यात होणारे बदल व त्या बदलाचा परिणाम आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाद्वारे अभ्यासता येतो. आजच्या UPSC, राज्यसेवा, PSI, STI, ASO आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये भारताचा इतिहास या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्या घटनांचा मागोवा या अल्पशा प्रयत्नाने सफल करण्याचा अट्टाहास केला आहे.
आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकामध्ये तक्ते, नकाशे, तुलनात्मक माहीती मुक्त हस्ते वापर करण्यात आलेला आहे. त्या आधारे हा विषय सोपा आणि मनोरंजक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात सध्याच्या परीक्षेतील प्रश्नांच्या काठिण्य पातळीचा विचार करून जास्तीत जास्त विस्तृत व सुटसुटीत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा हा प्रथमच प्रयत्न विद्यार्थ्यांना नक्कीच आवडेल यात तिळमात्र शंका नाही.
वैदिका पक्सिकेशन, औरंगाबाद
विठ्ठल पुंगळे
Reviews
There are no reviews yet.