Availability: In Stock

Vitthal Bade – Pandhra Ghoda – Errorless A 2 Z Solution 200+ Prashnapatrika Police Bharati – 2025 – 26 Aavruti

Original price was: ₹750.00.Current price is: ₹530.00.

Product details

Publisher ‏ : ‎ Maharashtra Publication; 2026th edition (25 September 2025)
Language ‏ : ‎ Marathi
Reading age ‏ : ‎ 10 years and up
Item Weight ‏ : ‎ 432 g
Dimensions ‏ : ‎ 19 x 9 x 2 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Maharashtra Publication
Generic Name ‏ : ‎ Printed Educational Books

Description

Vitthal Bade – Police Bharti Errorless – A to Z Solution – पोलीस भरती ERRORLESS A to Z सोल्युशन – 200+ प्रश्नपत्रिका – 2023 व 2024 मधील सर्व प्रश्नपत्रिका – New 3rd Edition 2025 – 26

A To Z Solution Police Bharati Pandhra Ghoda 2025-26 Errorless 200+ Prashnapatrika-Vitthal Bade-Maharashtra

भावी पोलिसांनो,

महाराष्ट्रातील लाखो जिद्दीने पेटलेले विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्यासाठी प्रयत्न करत असतात. पोलीस भरती म्हणजे तुमच्या बुद्धीचा आणि शारीरिक क्षमतेचा कस लागतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणच महाराष्ट्र पोलिसात सहभागी होतात.

पोलीस भरती करणारे विद्यार्थी हे बहुसंख्येने ग्रामीण भागातील असतात, अनेकदा ते शारीरिक दृष्ट्या सक्षम असतात. हुशारही असतात, परंतु अभ्यासाची योग्य दिशा मिळत नाही. त्यासाठी प्रश्नांचा योग्य आणि जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात? त्यांची काठीण्य पातळी किती असते? कोणत्या घटकावर किती प्रश्न येतात ? या गोष्टी आपल्या सहज लक्षात येतात.

याआधी आलेले प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांचे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शकच असतात. आपल्या पोलीस भरती ग्रंथ या प्रश्नसंचामध्ये घटकनुसार प्रश्नांचे डिटेल विश्लेषण केलेले आहे, परंतु सरावासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायचे असते, त्यासोबतच प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, कारण प्रश्न सोपा असेल किंवा अवघड असेल, मराठीचा असेल किंवा भूमितीचा अवघड प्रश्न असेल, प्रत्येकच प्रश्न आपल्याला एक गुणाला असतो आणि एकेक गुण आपली निवड ठरवत असतो.

या पुस्तकात तुम्हाला प्रश्नपत्रिकेनुसार प्रत्येक प्रश्नाचे A To Z सोल्युशन दिले आहे. या पुस्तकात दिलेल्या सर्वच प्रश्नपत्रिका तुम्ही वेळ लावून सोडवा. गरज पडल्यास पुन्हा पुन्हा सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवताना त्या OMR शीटवरच सोडवा. जेणेकरून अंतिम परीक्षेमध्ये तुम्हाला गोल करण्याची सवय होईल आणि अंतिम परीक्षेत होणाऱ्या सिली मिस्टेक टाळता येतील. जे प्रश्न अवघड वाटतात, त्या प्रश्नांना विशिष्ट प्रकारची खूण करून ठेवा आणि ते प्रश्न पुन्हा पुन्हा अभ्यासा, जेणेकरून अवघड वाटलेले प्रश्न प्रश्नपत्रिका सोडवताना चुकले तरी अंतिम परीक्षेत मात्र ते चुकणार नाहीत. त्यासाठी सराव महत्वाचा आहे. पोलीस भरती A TO Z सोल्युशन या प्रश्नसंचाच्या माध्यमातून तुमचा अनेक प्रश्नांचा अभ्यास होणार आहे, तसेच सराव होणार आहे आणि त्यातून तुम्हाला योग्य दिशा सुद्धा मिळणार आहे.

या प्रश्नसंचाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा.

येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा !!

प्रा. ज्ञानेश्वर बांगर (महाराष्ट्र अकॅडमी, पुणे)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vitthal Bade – Pandhra Ghoda – Errorless A 2 Z Solution 200+ Prashnapatrika Police Bharati – 2025 – 26 Aavruti”

Your email address will not be published. Required fields are marked *