Availability: In Stock

संक्षिप्त महाभारत स्वरूप आणि कथाशय – Sankshipt Mahabharat Swarup Aani Kathashy

250.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan (17 March 2024); Goel Prakashan, 162, Budhwar Peth, Appa Balwant Chowk, Pune-411002
Language ‏ : ‎ Marathi
Perfect Paperback ‏ : ‎ 288 pages
Reading age ‏ : ‎ 8 years and up
Item Weight ‏ : ‎ 350 g
Dimensions ‏ : ‎ 23 x 21 x 3 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Goel Prakashan, 162, Budhwar Peth, Appa Balwant Chowk, Pune-411002

Description

श्रेष्ठ साहित्य हे संस्कृतीचं आधारतत्त्व असतं, कारण ते संस्कृतीवर पसरणार्‍या कालिक तवंगाशी नव्हे, तर तिच्या मूलभूत मूल्याशी बांधलेलं असतं! महान लेखक-कवी अशा मूलभूत मूल्यांचा शोध घेणारे मानवी जीवनाचे भाष्यकार असतात. तमाचं आकलन आहे, पण ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही त्यांची प्रतिज्ञा आहे. सैतान अनेक लढाया जिंकतो, पण अखेर युद्ध जिंकतो तो परमेश्वर, हा त्याचा सांगावा आहे. पृथ्वी नामक ग्रहावर वावरणार्‍या माणसाला दिलेलं हे आश्वासन आहे’, असे वि.वा.शिरवाडकर म्हणतात.

महान विदूषी दुर्गाबाई भागवत तर म्हणतात, ‘महाभारतासारखी महान प्रगल्भ तसेच श्रेष्ठ कलाकृती आपल्या जनसामान्यांच्या समाज-संस्कृतीचा अत्यंत अविभाज्य व अभिमानास्पद भाग झाली आहे. त्यातील वासुदेवाची भगवद्गीता तर आपल्या जीवनाची मार्गदर्शिका झालेली आहे. व्यासांसारखा प्रगल्भ प्रतिभेचा ग्रंथकार शतकाशतकांतून वाहत आणि विकसित होत चाललेल्या वैचारिक, तात्विक व भावनिक सूत्रबंधांशी स्वतःला असा निःसंदिग्ध गोवून टाकतो. त्यावेळी कळतनकळत साहित्यपणाचे-काव्याचे त्रिकालतीर्थच सहजपणे आकाराला येते. मानवी जीवनाचे महावस्त्र हे, अटळ यातना दुःख, सचेतनत्व आणि परस्परमैत्र या तिहेरी धाग्यांनी अतूट पण अत्यंत व्यामिश्रतेने गुंफले गेलेले आहे. वनवास-अज्ञातवास तसेच जीवनातील अनंतमयी दुःखाचे, सूडाचे, शापवचनांचे तसेच स्वरूप आणि विश्वरूप यांच्या प्राणबंधाचे सौभाग्य-तत्त्वदर्शन महाभारतासारख्या महान कलाकृतीत ठायी ठायी आढळते’.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संक्षिप्त महाभारत स्वरूप आणि कथाशय – Sankshipt Mahabharat Swarup Aani Kathashy”

Your email address will not be published. Required fields are marked *