Description
स्वयंशिस्तीशिवाय संयम, धैर्य, न्याय आणि शहाणपण हे चार सद्गुण प्रत्यक्ष जीवनात अवतरणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच स्वयंशिस्तीला अपार महत्त्व आहे. खरे तर स्वयंशिस्त हाच सद्गुण आहे आणि सद्गुण हीच स्वयंशिस्त! लू गेह्रिगपासून मार्कस ऑरेलियस, क्वीन एलिझाबेथ, जॉर्ज वॉशिंग्टन, मार्था ग्रॅहम, हॅरी ट्रुमन, जॉयस कॅरोल ओट्स, बुकर टी. वॉशिंग्टन, फ्लॉइड पॅटरसनपर्यंत ज्या महान व्यक्तींच्या महानतेचे दर्शन आपण घेतले. त्यांनी स्वयंशिस्तीसह वरील चार सद्गुणांची संयमासह सहनशक्तीची कास धरली. एकूणच, एक अखंड, एकजिनसी, सुसंवादी माणूस हा या चार सद्गुणांच्या उपासनेतून उदयाला आलेला असतो. आत्मनियंत्रणातून तसेच विचारपूर्वक आणि पूर्वनियोजनाने वरील चार सद्गुणांच्या दिशेने व दृष्टीने एकेक पाऊल पुढे जात राहणे, हे एक प्रकारे श्रेष्ठत्त्वाकडे जाणेच असते. जगद्विख्यात जर्मन महाकवी गटे ह्याने रचिलेल्या नाट्यकाव्यात, ‘फाउस्ट’मध्ये म्हणतो,
Reviews
There are no reviews yet.