Description
विसाव्या शतकातील क्रांतिकारी तत्त्वज्ञ, विश्वाचा आध्यात्मिक शिक्षक म्हणून जे. कृष्णमूर्ती विशेषत्त्वाने ओळखले जातात. दोन महायुद्धाने संपूर्ण जगाला हादरून टाकणाऱ्या विसाव्या शतकातील अस्वस्थ आणि विलक्षण भयग्रस्ततेत वावरणाऱ्या जगताला-माणसाला खऱ्या अर्थाने भयमुक्त करीत, सर्वार्थाने मुक्ततेचा (टोटल फ्रीडम ) साक्षात्कारी मार्ग दर्शवणारे जे कृष्णमूर्ती स्वयंप्रकाशी योगी होते. जे. कृष्णमूर्ती जगभरात आपल्या शिकवणूकीने त्यांनी लाखो लोकांची मने जिंकली. त्यामध्ये बुद्धिवंतांबरोबरच सामान्य माणसे, तरुण वा ज्येष्ठ या सर्वांचा समावेश होतो. कृष्णमूर्तीच्या शिकवणुकीमुळे मानवी दुःखाचे परिमाण, विस्तार यांच्यात बदल घडला. त्याने थेट मानवी जाणिवेच्या गाभ्यालाच हात घातला. कृष्णमूर्तीची शिकवण परिपूर्ण असून, ती मानवी अस्तित्त्वालाच व्यापून उरते. शारीरिक स्तरांपासून माप्पसाच्या खोल अंतर्यामापर्यंत समग्र मानवी जीवनाचा यात अतंर्भाव होतो. रोजच्या जीवनातील समस्यांना सामोरे जायला, ही शिकवणच आपल्याला सर्वतोपरी सहाय्यभूत ठरणार आहे. कृष्णमूर्ती विचारधारेच्या दिव्यत्त्वाच्या प्रकाशात जीवनाचे आतंरबाह्य विकसन-परिवर्तन सहज घडू शकते. जे. कृष्णमूर्तीचा जीवनपट आणि त्यांची सखोल, समृद्ध आणि सर्वार्थाने मूलगामी स्वतंत्र विचारधारा-शिकवण मोठ्या काळजीने जाणून घेणाऱ्या मराठी वाचक-भाषिक • जिज्ञासूंना आमचा हा अल्पसा प्रयत्न निश्चित आवडेल.
डॉ. कमलेश सोमण (एम.ए. पीएचडी) हे कृष्णमूर्तीची शिकवण गेली २७-२८ वर्षे मोठ्या प्रेमाने व आस्थेने अभ्यासत आहेत. लेखक, समीक्षक, अनुवादक, वक्ते तसेच जे. कृष्णमूर्ती यांच्या शिकवणूकीचे अभ्यासक. आजवर त्यांचे शंभराहून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले असून, त्यातील सत्तर अनुवाद आहेत. धायरी, पुणे येथील जे. कृष्णमूर्ती विचारमंचाचे ते संचालक आहेत.
Reviews
There are no reviews yet.