Description
एपिक्टेटस एक ग्रीक-रोमन स्टोईक तत्त्वज्ञ!
एपिक्टेटस, हा मूलतः गुलाम असला, तरी महान तत्त्वज्ञ होता. गुलामीतून मुक्त झाल्यानंतर तो राज्यातील तरुणांना जीवनाचे व तत्त्वज्ञानाचे धडे देऊ लागला. सॉक्रेटीस आणि प्लेटो यांच्या विचारसरणीचा एपिक्टेटसवर फार मोठा प्रभाव होता.
एपिक्टेटसच्या विचारसरणीचा मार्कस ऑरेलियस पासून मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांपर्यंतच्या प्रभूतींवर मोठा खोल आणि
चिरस्थायी प्रभाव दिसून येतो. एपिक्टेटसचे तत्त्वज्ञान हा जीवनाचा एक मार्ग आहे.
एपिक्टेटस म्हणतो,
सर्व बाह्य घटना आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, म्हणूनच जे काही घडेल, ते शांतपणे आणि वैराग्यपूर्वक आपण स्वीकारायला हवे! व्यक्ती हीच त्याच्या स्वतःच्या कृत्यासाठी जबाबदार असते. महत्त्वाचा असतो, तो आत्मशोध आणि आत्मशुद्धीकरण!
जे जे चांगले आहे, ते आपल्या उत्कट प्रयत्नाचे उद्दिष्ट असले पाहिजे! आपल्या चुका, आपले भ्रम तसेच आपले दुर्दैव, हे आपल्याला आत्म्याच्या गुलामगिरीकडे नेत असते.
Reviews
There are no reviews yet.