Description
तुमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला म्हणून तुम्ही कधी वादाच्या भोवर्यात सापडला आहात का?
तुमचा मुद्दा समजून घेण्याच्या तुमच्या सहकार्याच्या अक्षमतेमुळे तुम्ही कधी चक्रावून गेला आहात का?
किंवा, तुमचं म्हणणं कोणी ऐकत नाही याचा तुम्हाला कंटाळा आलाय का?
असं होणारे तुम्ही एकटेच नाही आहात. एक बडा उद्योगपती, ज्याला सतत असं वाटायचं की आपण मूर्खांच्या गराड्यात सापडलो आहोत, त्याच्याशी थॉमस एरिक्सन यांची भेट झाली. ती भेट अत्यंत भयानक होती. त्या भेटीनंतर थॉमस एरिक्सन यांनी, लोक कामं कशी करतात, एकमेकांशी सुसंवाद साधण्याकरता आपल्याला सतत संघर्ष का करावा लागतो हे समजून घेण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं.
एरिक्सन यांनी मानवी वर्तनाचं चार प्रकारात वर्गीकरण केलं आहे, प्रत्येक वर्तनाला त्यांनी एका रंगाचं नाव दिलं आहे : लाल, निळा, हिरवा आणि पिवळा. या प्रत्येक वर्तनाचं मूल्यमापन करण्याची साधी परंतु अभिनव पद्धत म्हणजे ‘सराउंडेड बाय इडियट्स (मूर्खांच्या गराड्यात)’ हे पुस्तक आहे. तुमच्या आजुबाजूच्या लोकांची – मग ती ऑफिसमधली असतील वा अन्यत्र – त्यांची देहबोली समजून घेण्यापासून संघर्ष हाताळणीपर्यंत, तसंच त्यांना प्रभावित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्लृप्त्या या पुस्तकात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुमची खात्री पटेल, की मूर्ख इतर लोक आहेत, तुम्ही नाही!
Reviews
There are no reviews yet.