Description
आपल्याला भविष्याकडून काय हवे आहे, ते आपल्या इच्छेतून प्रकट होत असते. इच्छेचेच पुढे आशेत-विश्वासात रुपांतर होते. विश्वास हा आपल्या आयुष्यात अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत असतो, याचे विस्मरण कधी होऊ देऊ नका! एखादे कार्य सफल होईल, असा जो विश्वास असतो, तो प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आपल्याला मानसिक बळ देतो. एकूणच, विश्वासाला-श्रद्धेला अपार महत्त्व आहे. कारण हा विश्वासच तुम्हाला फल प्राप्त करून देणार आहे. ईश्वरी कृपाप्रसाद हा त्यातूनच आपल्याला लाभत असतो.
आपल्या मनातील ध्येय साध्य करण्याच्या दिशेने मार्ग दाखवण्याचे काम विश्वास करतो. त्याचबरोबर आपण ध्येय नक्की गाठू, याची खात्रीदेखील त्या विचारावरील विश्वासामुळेच मनात स्थिर होत असते.
आपले स्वतःचे वर्तन बदलायचे असेल, तर आपल्याला स्वतःच्या मनातील विश्वासापासून सुरुवात करावी लागते. उत्कृष्ट ध्येय, उत्कृष्ट समर्पित वर्तन, उत्कृष्ट निष्पत्ती यांचे मॉडेलिंग करायचे असेल, तर आपल्याला आपल्या मनात विश्वासाचे मॉडेल तयार करावे लागेल.
मनात दृढ विश्वास असला की, हातून उत्कृष्ट कार्य घडू शकते. हा विश्वास तुमच्या मज्जासंस्थेला थेट आज्ञा देतो. एखादा विचार खरा किंवा योग्य असल्याचा विश्वास तुमच्या मनात स्थिर झाला की, ती स्थिती किंवा विचार यांना अनुसरून परिस्थिती अस्तित्वात असल्याप्रमाणे तुमचे वर्तन आपोआप होऊ लागते.
Reviews
There are no reviews yet.