Description
Maharashtrache Shasan Aani Rajkaran
Dr. Dnyandeep Bhaisare
या पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे असून यामध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, महाराष्ट्राच्या राजकारणातील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटक, महाराष्ट्र राज्याचे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, राजकीय पक्ष आणि दबाव गट, ७३ वी घटनादुरुस्ती आणि ग्रामीण प्रशासन, ७४ बी घटनादुरुस्ती आणि शहरी प्रशासन, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी, केंद्र व महाराष्ट्र राज्य संबंध, महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्वलंत प्रश्न इत्यादी घटकांवर विस्तृत व मुद्देसूद माहिती दिलेली आहे. पुस्तकातील भाषा साधी, सरळ व सोपी असल्याने प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना मुख्यत्वे करून विद्यार्थ्यांना यामध्ये दिलेली माहिती कमी वेळात आत्मसात करता येईल आणि मुद्यांच्या आधारे चिरकाळ स्मरणात ठेवता येईल. पुस्तक लिहिताना अनेक संदर्भ ग्रंथांचा आधार घेण्यात आलेला असल्याने पुस्तकातील माहिती निश्चितच अचूक व वस्तुनिष्ठ असण्यावर भर आहे.
गोंडवाना विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात एम. ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाला ‘महाराष्ट्राचे राजकारण’ हा विषय अभ्यासण्यासाठी असून या विषयाच्या अभ्यासक्रमाचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमधील पदवी व पदव्युत्तर विभागातील राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सुद्धा प्रस्तुत पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
Political Science Book For MPSC, UPSC Mains Optional
Reviews
There are no reviews yet.