Description
Police Bharti 103 Prashnapatrika Sanch
कोणत्याही परीक्षेची तयारी करतांना सुरुवात करायची असेल तर प्रथमतः मागील वर्षातील प्रश्नपत्रिका, क्रमिक पुस्तके, संदर्भ पुस्तके व सराव प्रश्नसंच इ. बाबीचा समन्वय साधून अभ्यास करावा लागतो.
एखाद्या युद्धाचा दाखला द्यावयाचा असेल आणि त्यात विजयी व्हायचं असेल तर त्याकरीता खालील बार्बीचा विचार करावा लागतो.
* युद्ध कोणाशी करायचं आहे?
* शत्रुपक्षाची बलस्थाने व कमकुवत स्थाने काय आहेत ?
* माझे स्वतःचे बलस्थाने व कमकुवत स्थाने काय आहेत?
* मी सध्या कोणत्या स्थानी आहे?
* मला आणखी किती तयारी करावी लागेल?
* मला किती वेळ लागू शकतो?
* उपलब्ध सामुग्री माझ्याकडे आहे का?
* कमकुवत बाबी सुधारण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे लागेल का?
वरील सर्व प्रश्न निर्मितीचे प्रमुख कारण स्रोत म्हणजे PYQ हाच विचार करुन 2024 मध्ये महाराष्ट्र गृह विभागातील बेगवेगळ्या अस्थापन अर्तंगत झालेल्या पोलीस भरतीसाठी 103 प्रश्नपत्रिकांचा संच आपणास उपलब्ध करुन देत आहोत.
याची निर्मिती करतांना अचूकता, प्रत्येक विभागाने जाहिर केलेली उत्तर सूची, OMR शीट इ. बाबी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविता आल्या पाहिजेत यासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या शेवटीच उत्तरसूची देण्यात आलेली आहे.
या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करतांना विषयनिहाय विश्लेषण करणे ही सर्वात आवश्यक बाब असणार आहे. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विभागनिहाय पेपर विश्लेषण करुन देण्यात आले आहे. यामुळे परिक्षार्थ्यांना त्या विभागांतर्गत तयारी करतांना कोणत्या विषय घटकांना महत्व दिले पाहिजे, हे समजून घेता येईल.
– द युनिक टीम
Reviews
There are no reviews yet.