Description
Samajshastra Decode Prashna-Uttar Swarupath Paper-1 Vaikalpik vishay (Sociology) UPSC-MPSC Shivaji Kale (समाजशास्त्र डिकोडेड) Unique
प्रस्तावना
स्पर्धा परीक्षांची तयारी करणे हा नेहमीच एक आव्हानात्मक प्रवास असतो, विशेषतः जेव्हा वैकल्पिक विषय (optional subject) आणि त्याच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका हाताळायच्या असतात. या आव्हानाची जाणीव ठेवून आम्ही तुमच्या तयारीला अधिक प्रभावी आणि दिशानिर्धारित बनविण्यासाठी हे एक अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेले आणि अभ्यासासाठी उपयुक्त साधन म्हणजे “समाजशाख डीकोडेड प्रश्न-उत्तर स्वरूपात.”
हे पुस्तक 375 पेक्षा अधिक निवडक प्रश्नांवर आधारित आहे. जे UPSC (2013-2025) आणि MPSC (2006-2011) समाजशास्त्र वैकल्पिक प्रश्नपत्रिकांमधून काळजीपूर्वक संकलित केलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण करून अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचे स्पष्ट आकलन होईल अशा रीतीने स्पष्टीकरण दिले आहे. ही सर्व उत्तरे अशा तज्ज्ञांच्या टीमने तयार केली आहेत. ज्यांना परीक्षेचे स्वरूप, प्रवृत्ती (trends) आणि विषयातील सूक्ष्म बारकावे यांची उत्तम जाण आहे.
या पुस्तकाचा मुख्य हेतू म्हणजे PYQs आणि संभाव्य प्रश्नांसाठी एकच सर्वसमावेशक मार्गदर्शक तयार करणे, ज्यामुळे तुमचा अभ्यास अधिक नेमका, लक्ष केंद्रित आणि परिणामकारक होईल आणि तुम्हाला समाजशास्त्रात 300+ गुण मिळविण्यास मदत होईल.
“समाजशास्ख डीकोडेड : प्रश्न-उत्तर स्वरूपात” हे पुस्तक तुमची तयारी सुलभ आणि परिणामकारक करण्यासाठी तयार केले गेले आहे, यामध्ये गुंतागुंतीच्या समाजशास्त्रीय संकल्पना सहजतेने समजावून सांगितल्या आहेत, तसेच परीक्षेत त्या प्रभावीपणे वापरता येतील अशा पद्धतीने त्यांचे विश्लेषण केले आहे.
प्रत्येक उत्तरामध्ये मॉडेल उत्तर, महत्त्वाचे मुद्दे, आणि अधिक वाचनासाठी संदर्भ (The Knowledge Box) दिले आहेत. प्रत्येक उत्तर सखोल विश्लेषण, संबंधित सिद्धांतांची समाकलन आणि आधुनिक उदाहरणांचा वापर या तीन आधारांवर आधारित आहे.
हे पुस्तक तुमच्या मूलभूत टिपा आणि अभ्यास सामग्री सोबत पूरक साधन म्हणून वापरावे, यातील सविस्तर विश्लेषणे आणि उदाहरणांमुळे विषयाची समज अधिक सखोल होईल आणि उत्तरलेखन अधिक प्रभावी बनेल असा मला विश्वास आहे. या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या गुंतागुंतीच्या वाटेवर आत्मविश्वासाने वाटचाल करू शकाल आणि अपेक्षित यश संपादन करण्यात मदत मिळेल अशी मी आशा करतो.
चला, आता समाजशाखात 300+ गुण मिळविण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया !
अनेक शुभेच्छा !
आपला,
शिवाजी काळे
Books from Sociology Available at AAI Book Centre or on
www.punebookdepo.com or call on 9922492415








Reviews
There are no reviews yet.