Description
Saral Seva Bharti Sampurn Margdarshak Adivasi Vikas Bharti | Mahila Bal Kalyan Vibhag Bharti | Samajkalyan Vibhag | ICDS Mukhya Sevika / Paryavekshika Aarogya Seva Aani Iter Saral Seva TCS IBPS Pattern के’ सागरीय राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून, समाज कल्याण विभागाकडून व महिला व बालविकास विभागा – कडून विविध पदांसाठी सरळ सेवा परीक्षा नियोजित आहेत. त्याशिवाय ग्राम महसूल अधिकारी (पूर्वीचे पद तलाठी), ग्रामविकास अधिकारी (पूर्वीचे पद ग्रामसेवक), बृहन्मुंबई मनपा कार्यकारी सहायक (लिपिक), कर निरीक्षक आदी पदांकरिताही नजीकच्या काळात सरळसेवा परीक्षा घेतल्या जाणे अंदाजित आहे. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी व चालू घडामोडी या 1.विषयांचा समावेश आहे. उपरोक्त सर्व सरळसेवा परीक्षांचा विचार करता या सर्व परीक्षांना एकाच वेळी उपयुक्त ठरावे, अशा दृष्टिकोनातून प्रस्तुतच्या सर्वसमावेशक संदर्भाची रचना साकारली आहे. आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांच्या परीक्षांचा विचार करून पदांशी संबंधित अशा पुढील चार विशेष प्रकरणांची सामान्यज्ञानाच्या अनुषंगाने रचना केली आहे. * आदिवासी : घटनात्मक संरक्षण, विकास व कल्याण * आदिवासींसाठी कार्य करणारे समाजसुधारक * बालविकासाच्या योजना * भारतातील सामाजिक समस्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा सारासार विचार करून मराठी विभागाची एकूण १८ प्रकरणांत, इंग्रजी विभागाची एकूण ११ प्रकरणांत, बौद्धिक चाचणी या विभागाची एकूण ८ प्रकरणांत, तर सामान्यज्ञान विभागाची एकूण १० प्रकरणांत तपशीलवार मांडणी केली आहे. सामान्यज्ञान या विषयांतर्गत व्यापक अभ्यासक्रमाचा परामर्श घेतला असून भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न, वनलाइनर्स, तक्ते व मुद्देनिहाय चर्चेच्या माध्यमातून विषयाची परिपूर्ण तयारी करून घेतली आहे. साधी-सोपी के’सागरीय भाषाशैली, परीक्षाभिमुख लेखन व आवश्यक ते सर्व काही अन् अनावश्यक ते काही नाही, ही त्रिसूत्री जपणारा हा संदर्भ विद्यार्थिमित्रांना निश्चितच यशोशिखरापर्यंत घेऊन जाईल, यात काहीच शंका नाही ! शुभेच्छांसह !! आपला,व्ही.एस. क्षीरसागर(K’Sagar)
Reviews
There are no reviews yet.