Description
Tatvadyan Iyatta : 12vi -तत्वज्ञान इयत्ता: बारावी
Available at Aai Book Centre or on
www.punebookdepo.com or call on 9922492415
सत्तामीमांसेची व्याप्ती आणि महत्त्व ध्यानात घेता, या पुस्तकातील पहिले तीन पाठ तत्त्वज्ञानाच्या या
शाखेतील प्रश्नांची चर्चा करतात. त्याचबरोबर या प्रश्नांसंबंधी आजचे विज्ञान काय सांगते याचीही माहिती
देतात. यामुळे तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा संबंध समजून घ्यायला तुम्हाला मदत होईल. ज्ञानमीमांसा हा चौथ्या
पाठाचा विषय आहे. यामध्ये ज्ञानाची संकल्पना आणि ज्ञानाचे स्रोत यांची चर्चा आहे. आपल्या कृतींचे नैतिक
मूल्यमापन कशाच्या आधारे करावे याचे विवेचन पाचव्या पाठात केले आहे. सहावा पाठ सौंदर्यवादी दृष्टिकोनाचे
स्वरूप स्पष्ट करून कलेच्या तत्त्वज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पनांची माहिती करून देतो. गेल्या वर्षीप्रमाणे या
वर्षीही एक पाठ विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्यातील परस्परसंबंधांचे विवेचन करणारा आहे. विज्ञान
आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा आढावा घेताना या विकासाने निर्माण केलेल्या नीतीविषयक प्रश्नांची दखलही
हा पाठ घेतो.
Reviews
There are no reviews yet.