Free delivery across Maharashtra on orders above ₹4999

Goel Prakashan – Rugnancha Ashadeep : Florence Nightingalechi Jeevan Kahani : Lady with the Lamp(Marathi) | रुग्णांचा आशादीप : फ्लोरेन्स नाइटिंगेलची जीवन कहाणी : लेडी विथ द लॅम्प

₹250.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan (24 December 2023); Goel Prakashan
Perfect Paperback ‏ : ‎ 240 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393624518
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393624512
Reading age ‏ : ‎ 8 years and up
Dimensions ‏ : ‎ 23 x 19 x 3 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Goel Prakashan

  • Fast delivery Shipped across Maharashtra in 2–5 working days.
  • 100% genuine books Sourced directly from publishers and distributors.
  • Easy returns Damaged or wrong book? We replace it.
  • Secure payment UPI, Cards, Net Banking & Cash on Delivery

Description

निर्भयी व धडाडीची सेवाभावी वृत्ती आणि स्वीकारलेल्या कार्यावरील प्रचंड निष्ठा, या बळावर रुग्णांची शुश्रूषा करून त्या सेवेला जगभर प्रतिष्ठा मिळवून देणारी फ्लॉरेन्स नाईटिंगेल ही इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या (शुश्रूषा) संस्थापिका आहेत. रशियाविरूध्द ब्रिटन, फ्रान्स, सार्डेनिया व तुर्कस्तान या देशांबरोबर क्रिमिया येथे १८५४ मध्ये मोठे युध्द सुरू झाले. तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयातील रुग्णपरिचर्याविषयक व्यवस्थेची जबाबदारी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्यावर सिडनी हर्बर्ट यांनी सोपवली आणि ती तिनं चोखपणे पार पाडली. सैनिकी रुग्णालय अतिशय गलिच्छ आणि आरोग्यदृष्ट्या दुर्लक्षित होते. रोग्यांची संख्या मोठी आणि वैद्यकीय साधनांचा अभाव अशी स्थिती होती. फ्लॉरेन्स यांनी मोठ्या जिद्दीनं आणि संयमानं त्या अव्यवस्थेतून सुव्यवस्था निर्माण केली. त्या वेळी लष्करी अधिकारी आणि डॉक्टर यांनी केलेला विरोध न जुमानता तिनं रुग्णसेवेला सुरुवात केली. त्यामुळे जखमी व आजारी सैनिकांच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडून तर आलेच, पण मृत्यूचं प्रमाणही कमी झालं. १८८३ मध्ये राणी व्हिक्टोरियाने फ्लॉरेन्सला ‘रॉयल रेड क्रॉस’ प्रदान करून तिचा सन्मान केला. पुढे १९०७ मध्ये ब्रिटिश सरकारकडून ऑर्डर ऑफ मेरिट हा किताब तिला बहाल करण्यात आला. हा किताब मिळविणारी ती पहिलीच महिला होती. यातून तिच्या कार्याचे महात्म्य अधोलेखित व्हावं! इ.स. १८६० मध्ये फ्लॉरेन्सने लिहिलेला ‘नोट्स ऑन नर्सिंग’ हा तिचा ग्रंथ जगभर गाजला. फ्लॉरेन्सच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा तिचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक परिचर्यादिन म्हणून साजरा केला जातो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – Rugnancha Ashadeep : Florence Nightingalechi Jeevan Kahani : Lady with the Lamp(Marathi) | रुग्णांचा आशादीप : फ्लोरेन्स नाइटिंगेलची जीवन कहाणी : लेडी विथ द लॅम्प”

Your email address will not be published. Required fields are marked *

Menu

Shop by category

Categories

Browse all books