Availability: In Stock

K-Sagar Polity of India with Special Reference to Maharashtra – पॉलिटी ऑफ इंडिया

Original price was: ₹750.00.Current price is: ₹525.00.

Product Details

Book: Polity of India
Author: K. Sagar (के. सागर) and Prof. V. B. Patil
Edition: 2025
Language: Marathi
Pages: 640
Item Weight: ‎ 1 kg 180 g
Dimensions: ‎ 29 x 23 x 3 cm
Publisher: K’sagar Publications

Description

केंद्र व राज्यसेवा मुख्य परीक्षेतील समीक्षणात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपाच्या २०२५ च्या नवीन अभ्यासक्रमानुसार
रचना केलेला केंद्र व राज्यसेवा पूर्व परीक्षांसह वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या इतर स्पर्धा परीक्षांनाही उपयुक्त असा एकमेव संदर्भ….

UPSC-MPSC पूर्व व मुख्य आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त सर्वसमावेशक संदर्भ

पॉलिटी ऑफ इंडिया

के’सागरीय

प्रा. व्ही. बी. पाटील, राज्यशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक आणि प्राध्यापक, व्यक्तीशः माझे ज्येष्ठ स्नेही व के’सागर परिवाराचे एक सुहृद. प्रकाशनाची काही पुस्तके त्यांच्या अभ्यासू लेखणीतून स्वतंत्रपणे साकारलेली तर काही पुस्तके त्यांनी मजबरोबर संयुक्तरीत्या लिहिलेली.

भारताची राज्यघटना साध्या-सोप्या शब्दांत, भारतीय राज्यव्यवस्था व भारतीय प्रशासन ही पुस्तके म्हणजे व्ही. बी. च्या व्यासंगी लेखणीतून साकारलेली अभ्यासशिल्पेच होत!

फर्गसन कॉलेजचे माजी प्राचार्य दिवंगत डॉ. वि. मा. बाचल व प्रकाशनाचेही असेच हृद्य संबंध. अस्मादिकांनी त्यांच्या सोबत लिहिलेला भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार हा संदर्भही विद्यार्थी मित्रांना भावलेला!

अस्मादिकांचं आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि इतर अनेक संदर्भमहाराष्ट्रीय तरुणांना भावलेले आणि आयोगाच्या परीक्षांकरिता उपयुक्त सिद्ध झालेले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या व सुधारित अभ्यासक्रमानुसार पूर्वीच्या प्रत्येकी १५० गुणांच्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सऐवजी प्रत्येकी २५० गुण असलेल्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सचा सामना आता आपणास करावयाचा आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे पूर्वीचे वस्तुनिष्ठ स्वरूपही आता परंपरागत झाले असून वस्तुनिष्ठ माहितीबरोबरच विश्लेषणात्मक स्वरूपाचा व विचाराला चालना देणारा आणि समीक्षणात्मक अभ्यासही परीक्षेच्या व नवीन अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचा ठरलेला आहे.

प्रस्तुतचा संदर्भ केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांच्या मुख्य परीक्षांमधील या सामान्य अध्ययनाच्या दुसऱ्या पेपरचा व केंद्र व राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सामान्य क्षमता चाचणी अंतर्गत

भारतीय राज्यघटना व आनुषंगिक अभ्यासक्रम लक्षात घेऊन रचना केला आहे. या परीक्षांचा अभ्यास उत्तम प्रकारे होऊन विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळविता यावेत, हा या पुस्तकाच्या रचने-मागील उद्देश होय.

यास्तव अस्मादिकांनी पूर्णतः नव्याने लिहिलेली २५-२६ प्रकरणे व राज्याच्या व केंद्राच्या पूर्व परीक्षेस व इतर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरतील, असे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न, व्ही. बी. पाटील सरांच्या व अस्मादिकांच्या वर उल्लेख केलेल्या ग्रंथांमधून अस्मादिकांनी संस्करित,
सुधारित व संपादित केलेला अभ्यासक्रमांतर्गत येणारा मजकूर यांचा समावेश या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे या संदर्भाचा दर्जा व उपयुक्तता निश्चितच वाढली आहे.

आयोगाच्या नव्या धतींनुसार अन् वाढत्या काठिण्यपातळीनुसार रचना केलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करून पुस्तकाची गुणवत्ता व उपयुक्तता वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

प्रकरण संपल्यावर जेथे जेथे एखादा कॉलम मोकळा असेल तेथे तेथे केंद्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत येऊन गेलेल्या निवडक व महत्त्वाच्या प्रश्नांचे चौकोन दिले आहेत.

निरपेक्ष भावनेने ज्ञानयज्ञ अखंड तेवत ठेवणारे एक निरपेक्ष व्यक्तिमत्त्व माझे जुने स्नेही व सहद-प्रा. प्रवीण चव्हाण यांनी या संदर्भाचे हस्तलिखित तपासून अनेक मौलिक सूचना केल्या. त्यामुळे पुस्तकाची उपयुक्तता वाढली असून दर्जाही उंचावला आहे.
त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्य मानतो.

विद्यार्थिमित्रांना अस्मादिकांचा हा प्रयत्न निश्चितच भावेल व आमची ही मनापासूनची धडपड त्यांच्या उपयोगी येईल, याची खात्री वाटते.

एवम्, के’सागरीय संदर्भमालेतील मेरुमणी ठरावा असा हा संदर्भ मित्रांनो, मी तुमच्या हाती सोपवीत आहे!

हार्दिक शुभेच्छांसह !!

आपलाच,

व्ही. एस. क्षीरसागर

(K’Sagar)
Ksagar Book Headlines for Polity of India with Special Reference to Maharashtra:

mpsc indian polity
best polity book
ksagar polity
polity optional book
polity notes
marathi indian polity
Ksagar Indian polity
mpsc booklist books
Indian polity marathi
mpsc indian polity in marathi
indian polity in marathi book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “K-Sagar Polity of India with Special Reference to Maharashtra – पॉलिटी ऑफ इंडिया”

Your email address will not be published. Required fields are marked *