Availability: In Stock

Ashwathama | अश्वत्थामा

199.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan (1 January 2023)
Paperback ‏ : ‎ 180 pages
Reading age ‏ : ‎ 10 years and up
Item Weight ‏ : ‎ 30 g
Country of Origin ‏ : ‎ India

Description

बा अश्वत्थामा, माणसानी आत्तापर्यंत अपार दुःख भोगले आहे. आजवरच्या मानव जातीच्या इतिहासात, किती तरी युद्धे लढाया झाल्या, किती तरी अश्रू वाहून गेले आणि मोठा विनाशकारी आविष्कार या पृथ्वीतलावर अवतरला. पण अजूनही आपण युद्धाला, हिंसेला, संघर्षाला नकार देत नाही आहोत, ही वस्तुस्थिती आहे. अरे अश्वत्थामा, सर्वांचे दुःख एकच आहे. माझं दुःख, तुझं दुःख वेगवेगळं नाहीये! अखिल मानवजातीचं दुःखं एकच आहे. मी म्हणजेच ही पृथ्वी आहे, मी म्हणजेच हे जग आहे! अखेरीस संपूर्ण मानव जातीचे मानसिक जग हे एकच असते!

मानवाच्या विघातक वृत्ती महाभारतकालात जेवढ्या अस्तित्त्वात होत्या, तेवढ्या आजही आहेत. तू अत्यंत मूर्खपणाने, पित्याने तुला सावध केले असतानाही, सूड-वैर भावनेच्या भरात, ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि पांडवांच्या कुळाचा नाश करायला निघालास ! दुर्योधनाने मोठ्या हट्टाने युद्ध आपल्या अंगावर ओढून घेतले आणि स्वतः बरोबरच सर्वांना खाईत लोटले. आश्रितपणाच्या भावनेने कौरव-पांडवांच्या युद्धात, तू आणि तुझा पिता सामील झालात! कुरूकुलाचा नाश झाला. युद्धाने तू मात्र तुझ्या पित्याला गमावलेस आणि अंगावर वासुदेवाचा शाप ओढून घेतलास!

द्रुपद-द्रोण यांच्या सूडचक्राचाही तू एक भाग झालास ! सतत द्वेष-सूड-दुष्ट शक्ती तसेच वैर यांच्या सोबतीत राहिल्यामुळे, तुझ्या मागे उभ्या असलेल्या विनाशाने तुझ्यावरच झडप घातली. म्हणून कित्येक हजार वर्षे, तू तुझे शापित चिरंजीवित्व सांभाळत, या पृथ्वीवर वणवण फिरतो आहेस. फिरणार आहेस!’

व्यासमुनी (प्रस्तुत कादंबरीतून)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ashwathama | अश्वत्थामा”

Your email address will not be published. Required fields are marked *