Description
Geography of Avdhut kalyane – Maharashtra and Indian Geography | Maharashtra Va Bharatacha Bhugol | Bhugolacha Gurumantra By Avdhut Kalyane | New Marathi 2026-27 Edition
लेखकाचे मनोगत
नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्राच्या भूगोलाच्या ‘जिस्ट’ची दुसरी आवृत्ती आपल्या सर्वांच्या हाती देत असताना अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्र भूगोलाच्या ‘जिस्ट’ च्या पहिल्या आवृत्तीस आपण दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादासाठी पहिल्यांदा सर्वांचे मनापासून आभार…! आपल्या सर्वांच्या या प्रेमामुळेच वर्षभराच्या आत या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली ; सोबतच भारताचा भूगोल आणि Gist of Maharashtra and India (Marathi edition) लाही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार…! तुमच्या याच प्रेमामुळे आपण आता आपल्या हक्काच्या ‘ध्यास प्रबोधिनी’ या संस्थेमार्फत तुम्हा सर्वांशी जोडले जात आहोत…!
एम.पी.एस.सी मधील विविध स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर विशेषतः संयुक्त अराजपत्रित गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आणि नुकत्याच आयोगाकडे गेलेल्या सर्व सरळसेवा परीक्षांसाठी तसेच राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. या घटकाचे महत्त्व, त्यातील प्रश्नांची काठिण्य पातळी यांचा सखोल अभ्यास असणे हे मार्क मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचे असल्याचे आयोगाच्या मागील तीन-चार वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवरून आपणास निदर्शनास आलेले आहे. यामुळेच आयोगाचे आत्तापर्यंतचे 2011 पासून ते 2026 पर्यंत सर्व मागील प्रश्न आणि त्याचे विश्लेषण केले असता त्यातून मिळालेला Approach आणि संदर्भ यानुसार आपण या पुस्तकाची रचना केलेली आहे. या विषयासाठी बरेच विद्यार्थी मोठे संदर्भ ग्रंथ वाचतात आणि त्यानंतर उजळणीसाठी त्या सर्वांना पुन्हा वेळ कमी पडतो. याच सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण हे सर्व संदर्भ ग्रंथ आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण यानुसार या आपल्या संदर्भ ग्रंथाची रचना केलेली आहे.
हे पुस्तक तयार करत असताना यामध्ये State board आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संदर्भ ग्रंथ यांचा सुद्धा योग्यरीत्या वापर केलेला आहे. कमीत कमी पानांमध्ये जास्तीत जास्त ‘Content’ कव्हर व्हावा यासाठी आपण योग्य ठिकाणी चार्ट्स दिलेले आहेत. सोबतच महत्त्वाच्या घटकांचे हस्तलिखित नकाशे आणि सरावासाठी Blank नकाशे सुद्धा प्रत्येक प्रकरणानंतर समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलातील सर्व गोष्टींचा दिशांनुसार क्रम, उतरता व चढता क्रम, प्रत्येक घटकांनंतर दिलेले विश्लेषणाचे चार्ट्स, महत्त्वाच्या ट्रीक्स, महत्त्वाच्या मुद्यांना केलेल्या चौकटा आणि प्रत्येक प्रकरणानंतर दिलेले आयोगाचे 2020 ते जुलै 2026 पर्यंतचे प्रश्न यामुळे अवघ्या काही तासात महाराष्ट्राच्या भूगोलाचा संपूर्ण अभ्यास तुम्ही करू शकता.
या निमित्ताने सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे कुटुंबीय तसेच माझ्या शालेय जीवनापासून ते आत्तापर्यंत मला पाठबळ देणारे सर्व गुरुवर्य यांचे मी पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो. या पुस्तकाचे अतिशय उत्तम डी.टी.पी. आणि अक्षर जुळणी करणारे शिवाजी सर , समर्पक मुखपृष्ठ करणारे श्रीमंत शिंदे सर , Printing ची जबाबदारी सांभाळणारे श्री. पंजाबराव सर आणि माझे सर्व सहकारी तसेच माझ्या कायम पाठीशी असणारे माझे जिवलग मित्र आणि मैत्रिणी यांचाही मी मनापासून ऋणी आहे…..!
सर्वांना मनापासून शुभेच्छा…!
सोबत आहोत, सोबत राहू ….!







Reviews
There are no reviews yet.