Availability: In Stock

Goel Prakashan – द प्रॉफेट | The Prophet-Marathi

150.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan (1 January 2018)
Language ‏ : ‎ Marathi
ISBN-10 ‏ : ‎ 8193881303
ISBN-13 ‏ : ‎ 978-8193881309
Item Weight ‏ : ‎ 170 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India

Description

ऑरफालीज नगरात बारा वर्षे राहून अलमुस्तफा आपल्या जन्मभूमीकडे जायला कमालीचा उत्सुक व सिद्ध झालेला आहे. पण असे असूनही त्याचे मन मात्र अवतीभोवतीच्या माणसांच्या सहवासात व संवादात गुंतून पडलेले आहे. ते गुंतलेले मन आणि आपल्या जन्मभूमीची अनिवार ओढ यांच्या ताणात त्याचा जीव वर खाली होतो आहे. काहीसा निराश, दुःखी असला तरीही अंतिम प्रवासासाठी व जन्मभूमीच्या कुशीत विसाव्यासाठी अलमुस्तफा उत्कंठित झालेला आहे. त्याच्या वियोगाच्या कल्पनेने व्यथीत झालेले नगरवासी त्याला विनवतात, ‘हे देवदूत, निरोप घेण्यापूर्वी, या जीविताच्या या धकाधकीत रुतलेल्या आमच्या मनाशी तू एकदा भरभरून बोल! आमच्यासाठी तू श्रेष्ट प्रतीचा आत्मनिष्ठ, प्रेमधर्मी आधुनिक प्रेषित आहेस. तू आम्हा सर्वांवर निर्वाज्य प्रेम केलेस. तुला झालेल्या सत्यदर्शनाच्या प्रकाशात, तुझ्या कर्मवैभवात तसेच तुझ्या अंतःकरणातील प्रचीतिसौंदर्यात आम्हाला न्हाऊन निघायचे आहे. तुझे साक्षात्कारी शब्द आम्ही आमच्या मुलांना सांगू ! मग त्या देवदूताने आपली मूलगामी व अविनाशी शिकवण हळूवारपणे नगरवासीयांच्या तळहातावर ठेवली.
खलील जिब्रान (१८८३-१९३१) द प्रॉफेट सर्व जगभर गाजले. जे जे ते वाचतात, ते ते त्याच्या प्रेमातच पडतात. आध्यात्मिक साधक म्हणून जिब्रानने जे अनुभवले, त्याचा अर्क द प्रॉफेट मध्ये उतरलेला आहे. यातील जीवनरहस्ये आणि सखोल, समृद्ध व स्वतंत्र तत्त्वगर्भता मानवाला सद्गतीच्या व परिवर्तनच्या दिशा दर्शवत आहेत. मानवी अस्तित्त्वाची गहनसत्ये जिब्रान आपल्या तळहातावर ठेवतो. त्यातील सौंदर्य व महात्म्य पाहून आपले मनही विस्मयचकित होते. खरे तर, हे एक मोठे आध्यात्मिक शहाणपण आहे.ज्याची आज तुम्हा-आम्हा सर्वांनाच मोठी गरज आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – द प्रॉफेट | The Prophet-Marathi”

Your email address will not be published. Required fields are marked *