Availability: In Stock

Goel Prakashan – Indistractable (Marathi) | इन डिस्ट्रॅक्टेबल

299.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan (9 June 2023); Goel Prakashan
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 216 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393624216
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393624215
Item Weight ‏ : ‎ 281 g
Dimensions ‏ : ‎ 21 x 14 x 1.5 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ Goel Prakashan
Generic Name ‏ : ‎ Books

Description

तुम्ही काही महत्त्वाचे काम करण्यासाठी टेबलाशी बसला आहात. पण तुमच्या फोनवर काही संदेश येतो आणि तुमच्या सकाळच्या वेळेत व्यत्यय येतो. तुम्ही पुन्हा तुमचे काम सुरु करणार तेवढ्यात कुणी सहकारी तुमच्या पाठीवर थाप मारत तुमच्याशी गप्पा मारू लागतो. घरी, तुम्हाला कुटुंबाबरोबर जो वेळ घालवायचा आहे, त्या वेळेत तुमचा स्क्रीनवर घालवलेला वेळ अडथळा आणतो. आणखी एक दिवस संपतो आणि पुन्हा एकदा तुमची व्यावसायिक आणि वैयक्तिक कामे रेंगाळतात.
जर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे काम केले तर काय होईल? जर तुम्ही तुमची एकाग्रता टिकवू शकलात तर तुम्ही काय साध्य करू शकाल ? जर तुमच्याकडे ‘अविचलित’ राहण्याची शक्ती असेल तर काय होईल?

आपल्याला विचलित करणाऱ्या सुप्त मानसिकतेकडे एयाल या पुस्तकात लक्ष वेधतो. उपकरणे बाजूला ठेवून देण्याइतका हा प्रश्न सोपा का नाही याचे विश्लेषण तो करतो. एखाद्या गोष्टीचा त्याग करणे किंवा मनावर ताबा ठेवणे हे कित्येकदा अव्यवहार्य असते कारण त्यामुळे आपल्याला तीच गोष्ट अधिक हवीशी वाटते.
तुम्ही जे करायचे ठरवले आहे ते तुम्ही कसे साध्य करू शकता यामागचे रहस्य एयालने संशोधनाने सिद्ध केलेल्या चार पायऱ्यांच्या नमुन्याद्वारे दाखवून दिले आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी न जाताही आपण तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग कसा करून घेऊ शकतो हे प्रस्तुत पुस्तक दाखवून देते.
या पुस्तकात पारंपरिक कल्पना बाजूला ठेवून एयाल यांनी खालील मुद्दयांची चर्चाही केली आहे –
* कामाच्या ठिकाणी मन विचलित होणे हे कंपनीतील वातावरण चांगले नसण्याचे लक्षण कसे आहे आणि ते बदलण्यासाठी काय करायला हवे.
* व्यक्तीच्या वागण्यावर खऱ्या अर्थाने कशाचा परिणाम होतो आणि वेळेचे नियोजन करणे हे खूप कठीण का आहे?
* तुमची नाती (आणि तुमचे लैंगिक आयुष्यही) तुम्ही अविचलित राहण्यावर का आणि कसे अवलंबून असते?
* सतत विचलित होणाऱ्या या जगात अविचलित राहणारी मुले कशी वाढवावीत?
सक्षम आणि सकारात्मक असे हे पुस्तक तुमचा वेळ आणि एकाग्रता यावर ताबा ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि व्यावहारिक तंत्रांची ओळख तुम्हाला करून देते. आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने हवे तसे आयुष्य जगण्यासाठी मदतीचा हात पुढे करते

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – Indistractable (Marathi) | इन डिस्ट्रॅक्टेबल”

Your email address will not be published. Required fields are marked *