Availability: In Stock

Goel Prakashan – The Diary of Young Girl | द डायरी ऑफ ए यंग गर्ल

225.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan. (1 January 2022)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 304 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393624267
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393624260
Reading age ‏ : ‎ 10 years and up
Item Weight ‏ : ‎ 500 g
Dimensions ‏ : ‎ 18 x 2 x 16 cm

Description

नाझींनी केलेल्या ज्यू नरसंहाराचा बळी ठरलेली आणि विख्यात किशोरवयीन रोजनिशीकार असलेली अ‍ॅनेलिस मेरी (अ‍ॅन) फ्रँक! अ‍ॅन फ्रँक हिचे वडील ओटो फ्रँक हे पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्यात लेफ्टनंट या पदावर होते. अ‍ॅन फ्रँकचे वास्तव्य बहुतेक काळ नेदरलँड्समधील मस्टरडॅममध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागातच होते. जुलै १९४२ पासून ज्यू नागरिकांचा छळ खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यावर हे कुटुंब ओटो फ्रँक याच्या कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका तात्पुरत्या निवार्‍यात राहू लागले. त्या गुप्त निवार्‍याला त्यांनी ‘सिक्रेट अनेक्स’ असे नाव दिले होते. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ या काळात अ‍ॅन फ्रँक रोजनिशी लिहित होती. अ‍ॅन सुमारे १५ वर्षांची असताना जर्मनांना त्यांच्या राहण्याच्या जागेचा पत्ता लागला आणि अ‍ॅन, तिचे कुटुंबीय आणि त्यांच्या बरोबर तिथे राहणारी इतर काही मंडळी यांना अटक करून त्यांची रवानगी त्यांनी नाझी छळछावण्यांमध्ये केली. १९४५ साली त्या छावण्यांमध्ये टायफस रोगाची साथ पसरली. त्याचा संसर्ग मारगॉट आणि अ‍ॅन या दोघींनाही झाला आणि त्यातच फेब्रुवारी किंवा मार्च १९४५ मध्ये अ‍ॅनचा मृत्यू झाला. अ‍ॅनच्या कुटुंबातील एकच व्यक्ती तेथून जिवंतपणे बाहेर आली, ती म्हणजे अ‍ॅनचे वडील – ओटो फ्रँक! मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या रोजनिशा जगापुढे आणाव्या, या हेतूने ‘अ‍ॅन फ्रँक – ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’ अशा नावाने १९५२ साली ही रोजनिशी प्रकाशित झाली आणि ती जगभर प्रचंड गाजली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – The Diary of Young Girl | द डायरी ऑफ ए यंग गर्ल”

Your email address will not be published. Required fields are marked *