Description
K-Sagar Publication – MAHA TAIT Sampurna Shikshak Abhiyogyata Va Buddhimatta Chachani | Shashikant Annadate, Swati Shete
Sampurna Shikshak Abhiyogyata Va Buddhimatta Chachani (MAHA TAIT) Dr. Shashikant Annadate, Swati Shete, K’sagar
के’ सागरीय…
महाताष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी वायाळामध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता च बुद्धिमता चाचणी (TAIT)-२०२५ या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन में व जून २०२५ मध्ये IBPS मार्फत करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा भरती करताना सर्व उमेदवारांना गुणवत्तेनुसार निवडीची समान संधी मिळावी यासाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी शासनाकडून जून २०२५ मध्ये आयोजित प्रोणार असल्याने प्रकाशनाकडून या परीक्षेच्या तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित डॉ. शशिकांत अजदाते व स्वाती शेटे यांबा IBPS पॅटर्नवर आधारित ‘संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ हा संदर्भग्रंथ प्रकाशित करण्यास आम्हास अतिशय आनंद होत आहे. शिक्षक अभियोग्यता परीक्षेला अभियोग्यता घटकात १२० गुणांसाठी १२० प्रश्न आणि बुद्धिमत्ता घटकात ८० गुणांसाठी ८० प्रश्न विचारले जातात. एकूण परीक्षा २०० गुणांची असते. परीक्षेचा अभ्यासक्रम व मागील २०१७ व २०२२ मध्ये झालेल्या ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन लेखकांनी सदरचा दर्जेदार संदर्भग्रंथ साकारला आहे.
डॉ. शशिकांत अन्नदाते कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक, नव्या पिढीतील अभ्यासू व होतकरू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या अथक परिश्रमातून परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी ‘संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (दुसरी आवृत्ती) हा संदर्भग्रंथ साकारला आहे. डॉ. शशिकांत अवदाते यांनी शिक्षण क्षेत्रातील व स्पर्धा परीक्षेतील एकूण ४८ संदर्भपुस्तके लिहिली आहेत. त्याच्या नेट-सेट पेपर पहिला पुस्तकाच्या ११ आवृत्ती,
संपूर्ण बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र १० आवृती व क्ल, आषद, समायोजन व्यक्तिमत्व पुस्तकाच्या ३ आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. यावरून त्यांच्या संदर्भग्रंथ लेखनातील उत्कृष्टता व विद्यार्थि प्रियता लक्षात येते. या पुस्तकाच्या सहलेखिका स्वाती शेटे यांनीदेखील ३० संदर्भग्रंथांचे लेखन केले असूर त्यादेखील TET CTET परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
प्रस्तुत संदर्भग्रंथाचे लेखन करण्यासाठी श्री. आचार्य देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व कोल्हापुरा तील नामवंत ज्येष्ठ विधिज्ञ मा. अॅड. के. ए. कापसे साहेब, संस्थेचे सचिव मा. मोहन गरगटे साहेब, संस्थेचे खजिनदार मा. गुणवंत रोटे साहेब संस्थेचे संचालक मंडळातील मा. डॉ. सुषमा रोटे मॅडम, मा. अॅड. अभिजित कापसे साहेब, मा. अॅड. विद्याधर पाटील साहेब आणि महावीर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उषा पाटील, माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, समन्वयक डॉ. महादेव शिंदे यांनी पुस्तक लेखनासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले, त्याबद्दल लेखकांनी त्यांचे ऋणी असल्याचे नमूद केले आहे. प्रस्तुत संदर्भ लेखनासाठी आई सौ. कमल अन्नदाते व वडील श्री. श्रीधरराव अन्नदाते यांचे आशीर्वाद महत्त्वाचे असल्याचे लेखक नमूद करतात.
प्रस्तुत संदर्भग्रंथात संपूर्ण अभ्यासक्रमाचे आठ विभागांतून लेखन करण्यात आले आहे. प्रकरणनिहाय मुद्दे व उपमुख्यांचे परीक्षाभिमुख विवेचन साध्या-सोप्या भाषेत करण्यात आले आहे. परीक्षेनुसार वाढत्या काठिण्य-पातळीचे प्रश्नही समाविष्ट केले आहेत. प्रस्तुतचा दर्जेदार संदर्भग्रंथ विद्यार्थिमित्रांना निश्चितच यशोशिखरापर्यंत घेऊन जाईल, यात शंकाच नाही.
शुभेच्छांसह.
आपला स्नेहांकित, व्ही. एस. क्षीरसागर (के सागर)
Best K’sagar Sampurna Shikshak Abhiyogyata va Buddhimatta Chachani (MAHA TAIT) Book







Reviews
There are no reviews yet.