Description

Vishwasaniy Marathi Vyakaran Va Shabdratn-Ganesh Rameshrao Karadkar (Mo. Ra. Walambe)

प्रथमावृत्तीची प्रस्तावना

विश्वसनीस मराठी व्याकरण व शब्दसंग्रह हे पुस्तक लिहिण्याचे महत्वाचे कारण म्हणजे मागील अनेक वर्षांपासून मराठी व्याकरण शिकवित असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब व गट क तसेच तलाठी, लिपिक, पोलीस भरती आणि तत्सम सरळसेवा स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांकडून मराठी व्याकरणाकरीता सरळ सोप्या भाषेत लिहिलेल्या विश्वसनीय पुस्तकाची वारंवार होत असतेती मागणी हे होय. याशिवाय माझा केक दिवसांचा हस्तलिखित व्याकरण प्रपंच, पुस्तकरूपाने सिद्धीस जावा अशी मनोमन एक सुम इच्छाही होती. त्यानुषंगाने उपरोक्त स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम, गतवर्षीचे प्रश्नसंच, स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या सूचना आणि माझा अध्ययन-अध्यापन अनुभव या सर्वांचा परिपाक म्हणाने प्रस्तुत परीक्षाभिमुख पुस्तकाची झातेती रचना होय.

या पुस्तकामध्ये प्रत्येक घटकाचे मुद्देसूद विश्लेषण केलेले असून, सरावासाठी भरपूर उदाहरणे दिलेली आहेत. आवश्यक तिये तक्ते, स्तंभ, वृक्ष, आकृत्या, स्पष्टीकरणे यांचा प्रभावी वापर करण्यात आलेला आहे. यात, महत्त्वाच्या घटकांच्या शेवटी एका दृष्टिक्षेपात या सदराखाली गोषवारा दिलेला आहे. महत्त्वाच्या संकल्पनांकरिता रंगीत व जाड अक्षरांचा वापर केल्यामुळे, परीक्षेपूर्वी कमी वेळात अपेक्षित मुद्यांची उजळणी करणे सोपे झाले आहे.

शब्दसंग्रह विभागातील सर्वच पाठ है महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन १९८६ ते २०२५ दरम्यान झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांतीत, सरळसेवा स्पर्धा परीक्षांतील गत १५ वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि शालेय पाठ्यपुस्तकांतीत परीक्षाभिमुख घटकांच्या समावेशाने तयार झालेले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या (IBPS and TCS) स्वरूपानुसार आणि मुख्यतः सरळसेवा परीक्षांचा आवाका व खोली लक्षात घेऊन या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. नमूद परीक्षांतील प्रश्नांची काठिण्यपातळी लक्षात यावी म्हणून लगतच्या वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांतील प्रश्नांचा देखीत संदर्भासाठी यात समावेश करण्यात आलेला आहे.

हे पुस्तक स्पर्धा परीक्षा उमेदवारांबरोबरच शालेय विद्यार्थी आणि अभ्यासकांनाही उपयुक्त ठरेत असा मता विश्वास आहे. स्पर्धा परीक्षा विश्वातील उमेदवार, शिक्षक, शालेय विद्यार्थी, अभ्यासक, जिज्ञासू या ग्रंथरूपी मुद्देसूद व्याकरणाच्या अभिनव प्रयोगाचे निश्चितच स्वागत करतील अशी आशा बाळगतो. या पुस्तकाच्या परिपूर्णतेसाठी आपल्या काही सूचना असल्यास कळवाव्यात, त्यांचे निश्चितच स्वागत केले जाईल व नंतरच्या आवृत्तीत गरजेनुसार भर टाकता येईल.

प्रकाशक, संपादक आणि या पुस्तक निर्मितीमध्ये महत्त्वाचे साहाय्य लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद ।

गणेश रमेशराव कन्हाडकर

Available at Ksagar Book Centre or on www.punebookdepo.com

or call on 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vishwasaniy Marathi Vyakaran Va Shabdratn-Ganesh Rameshrao Karadkar (Mo. Ra. Walambe)”

Your email address will not be published. Required fields are marked *