Availability: In Stock

Vocab Sanjeevani (Reloaded) By Vishal Savai,Gayatri Savai | वोकॅब संजीवनी

Original price was: ₹320.00.Current price is: ₹225.00.

Product details

Book Name: Vocab Sanjeevani (Reloaded) By Vishal Savai,Gayatri Savai | वोकॅब संजीवनी
Publication: Gayatri Publication
Author: Vishal Savai , Gayatri Savai
Edition: 3rd Edition
Publishing Date : March 2026
Language: English And Marathi
No. of Pages: 290 Pages
Product Dimension (in cm): 19 x 8 x 1 cm
Weight: 420 g

Description

Vocab Sanjeevani (Reloaded) by Vishal Savai,Gayatri Savai

मनोगत

प्रिय भावी अधिकारी मित्रांनो,

स्पर्धा परीक्षेच्या या महासंग्रामात उतरलेल्या तुम्हा सर्व जिद्दी योद्धांचे मनःपूर्वक स्वागत !

‘Vocab संजीवनी’ पुस्तक तसेच बॅचेस ला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मिळालेल्या अभूतपूर्व प्रेमानंतर, अधिक समृद्ध आणि अपडेटेड ‘Vocab संजीवनी Reloaded आवृत्ती तुमच्या हाती सोपवताना मला सार्थ अभिमान वाटत आहे.

मित्रांनो, मी स्वतः PSI पदापर्यंत पोहोचताना एक कटू सत्य जवळून अनुभवले आहे. अनेक हुशार विद्यार्थी केवळ ‘इंग्रजी’ या एका विषयामुळे यशाच्या उंबरठ्यावरून मागे फिरतात. त्यांतही Vocabulary (शब्दसंग्रह) हा असा भाग आहे जो एकूण पेपरच्या 40% ते 50% गुण कव्हर करतो, तरीही 90% विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करतात.

आपण कुठे चुकतो?

दडपण (Burden) परीक्षेच्या 10 दिवस आधी हजारो शब्द पाठ करण्याचा प्रयत्न करणे,

अयोग्य संदर्भ: कुठल्याही पुस्तकातून, विखुरलेल्या स्वरुपात शब्दार्थ पाठ करणे,

अस्पष्टता: काय वाचावे आणि काय सोडावे याचे योग्य मार्गदर्शन न मिळणे.

विस्मरण : वाचलेले शब्द लक्षात न राहणे.

याच समस्यांचे मूळ उपसा करण्यासाठी आम्ही मतजउ-इ संजीवनीफनावाचा हा महारथी रथ तुमच्यासाठी आणला आहे.

संजीवनी का? कारण ही केवळ शब्दांची यादी नाही, तर तुमच्या मरगळलेल्या इंग्रजी विषयाच्या गुणांना पुन्हा जिवंत करणारी आणि

तुमच्या स्वप्नांना उभारी देणारी एक मशक्तीफ आहे.

या ‘Reloaded’ आवृत्तीचे वैशिष्ट्येः

आम्ही यामध्ये ‘Small Daily Improvement’ (SDI) ही जगप्रसिद्ध संकल्पना राबवली आहे.

Daily Dose : रोज फक्त 100 शब्द, 55 दिवसांचे मिशनः 55 दिवसात संपूर्ण तेलरल बर हुकूमत ! ह्या नवीन एडिशन मध्ये प्रत्येक Target Day मध्ये Root Words चा समावेश केलेला आहे. Idioms तसेच Synonyms, Antonyms यासारख्या शब्दांना आणखी समानार्थी शब्द दिले आहे जेणेकरून तुम्हाला दुसरे काहीही करण्याची गरज नाही.

आपण भारतातील 3 ते 4 Authentic Sources मधून डेटा घेतलेला असून आयोगाच्या धर्तीवर आधारित Idioms, Phrases, One Word Substitution, Synonyms, Antonyms, Root Words, Spellings आणि Phrasal Verbs चे अचूक संकलन केलेले आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे, रोजचे हे छोटे प्रयत्न तुम्हाला Vocab चा महासागर पार करून देतील. हे पुस्तक म्हणजे केवळ माहितीचा साठा नसून, तुमच्या कष्टाला फळाची जोड देणारा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

आम्ही हे पुस्तक निर्दोष करण्यासाठी पराकाष्ठा केली आहे, तरीही तुमच्या सूचनांचे स्वागतच असेल कारण हे पुस्तक माझ्यापेक्षा

तुमचे जास्त आहे. परीक्षेच्या रणांगणावर, शब्दांचे शस्त्र तुमच्या हाती देतोय!

येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हा सर्व भावी सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा !

English Vocabulary For MPSC-UPSC -SSC

Vocab Sanjeevani ( Your Daily Target Plan ) by Vishal Savai / Aniket Shingare

Available at Aai Book Centre or on www.punebookdepo.com

or call on 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vocab Sanjeevani (Reloaded) By Vishal Savai,Gayatri Savai | वोकॅब संजीवनी”

Your email address will not be published. Required fields are marked *