Availability: In Stock

Santosh Vattamvar – SAMPURN GANIT SOLVED PYQ GUIDE 2003 to 2025 – CHINMAY PUBLICATION || संपूर्ण गणित सॉल्वड् PYQ गाइड २००३ ते २०२५ – चिन्मय प्रकाशन

Original price was: ₹550.00.Current price is: ₹440.00.

Product details

Book Name: Sampurn Ganit PYQ Guide 2003 to 2025
Publication: Chinmay Publication
Author: Santosh Vattamvar
Edition: 1st 2025
Language: Marathi
No. of pages: 625 pages
Product Dimension (in cm): 28-21-.05 cm
Weight: 1.5 kg

Description

Sampurna Ganit Solved PYQ Guide 2003 To 2025-Santosh Wattamwar-Chinmay (संपूर्ण गणित)

दोन शब्द…

प्रिय विद्यार्थी मित्रांनो…..

MPSC आणि UPSC च्या साधारणतः 2003 ते 2015 या कालावधीत झालेल्या विविध परीक्षांमधील 1500 पेक्षा जास्त प्रश्नांचे प्रकरणानुसार वर्गीकरण व त्यांचे सखोल विश्लेषण पुस्तकरूपाने आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे.

या पुस्तकात MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा (CSAT), PSI, STI, ASO, Tax Asst, Clerk, RTO, Forest आणि Engineering Services च्या झालेल्या परीक्षांमधील प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, UPSC (CSAT) मधील बरेच प्रश्न्न MPSC च्या वेगवेगळ्या परीक्षांना बऱ्याचदा आवृत्तीत झालेले आहेत. ही बाब लक्षात घेवून, UPSC चे जे प्रश्न आयोगाच्या परीक्षेला आवृत्तीत होण्याची शक्यता आहे, अशा प्रश्नांचेही विश्लेषण या पुस्तकात समाविष्ट केलेले आहे.

आपण केलेल्या अभ्यासाचे मोजमाप करण्यासाठी PYQ हे एक सार्थक साधन म्हणून काम करतात व ते आपल्या अभ्यासाची दिशा ठरविण्यासही मदत करतात. आपल्या अभ्यासाला पुर्णत्व देण्यासाठी व स्पर्धात्मक दृष्टीकोनातून प्रश्ঙ্গ कशा पद्धतीने सोडवावेत याचे मार्गदर्शन या पुस्तकातून आपल्याला नक्की होईल, याची मला खात्री आहे.

यातील प्रश्नांची उत्तरे देताना, शक्य तेवढे जास्तीत जास्त विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. शक्य होईल तेवढ्या प्रमाणात सूत्र व समीकरणांपासून दुर ठेवलेले आहे. कमीत कमी वेळेत उत्तरापर्यंत पोहचण्यास आवश्यक पद्धतीनेच उदाहरणे सोडवून दिलेली आहेत. या पुस्तकाच्या आधारे आपण PYQ चा अभ्यास केल्यास आपल्याला अपेक्षित गुण मिळवून यादीत आपले स्थान नक्की मिळवता येईल, याची मी आपल्याला ग्वाही देतो.

उदाहरणाला सोडविताना त्यात दिलेली माहिती, आपल्याला काढावयाची राशी, दिलेली माहिती व काढावयाची राशी यात असणारा संबंध, राशीची किंमत काढताना लागणाऱ्या गणितीय संकल्पना, त्यात असणारी आकडेमोड आणि आवश्यक विचारपद्धती या सर्वांना केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक आपल्या ‘यशाच्या मार्गात एक पायरी’ म्हणून काम करो, एवढीच अपेक्षा..!

आपलाच, संतोष वट्टमवार

SAMPURN GANIT SOLVED PYQ GUIDE 2003 to 2025 – CHINMAY PUBLICATION || संपूर्ण गणित सॉल्वड् PYQ गाइड २००३ ते २०२५ – चिन्मय प्रकाशन

आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त…

…वैशिष्ट्ये…

सूत्र आणि समीकरणांचा वापर न करता उत्तरांचे विश्लेषण

2003 ते 2025 या कालावधीतील आयोगामार्फत झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांतील 1500 पेक्षा अधिक प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण

आयोगाला अपेक्षित असणाऱ्या आणि वेळ वाचविणाऱ्या द्धतीने विश्लेषण

UPSC च्या परीक्षेत आलेल्या आणि भविष्यात MPSC च्या विविध परीक्षांना जमेप्रेत असणाऱ्या प्रांचा समावेश

शक्य त्या ठिकाणी Vedic पद्धतीने विश्लेषण

राज्यसेवा, संयुक्त गट ब व क, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

Available at AAI Book Centre or on www.punebookdepo.com

or call on 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Santosh Vattamvar – SAMPURN GANIT SOLVED PYQ GUIDE 2003 to 2025 – CHINMAY PUBLICATION || संपूर्ण गणित सॉल्वड् PYQ गाइड २००३ ते २०२५ – चिन्मय प्रकाशन”

Your email address will not be published. Required fields are marked *